भारतात मे महिन्याच्या मध्यात कोरोना मृत्यूंचा उच्चांक गाठला जाणार आहे. दररोज 5 हजार 600 मृत्यू होऊ शकतात असा इशारा US Study च्या अहवालाने दिला आहे. याचाच अर्थ एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारतात सुमारे साडेतीन लाख लोकांचा मृत्यू कोरोनामुळे होऊ शकतो असंही या अहवालाने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
अवघ्या 15 दिवसात पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू
इन्स्टिट्युट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युशेन (IHME) या वॉशिंग्टन च्या संस्थेने COVID-19 projections या नावाने अहवाल सादर केला आहे. हा अहवाल 15 एप्रिलला प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये भारतात दुसरी लाट ही महाभयंकर ठरणार असून यामध्ये सुमारे 3 लाखांपेक्षा जास्त मृत्यू होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालात कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेवर उपाय म्हणून फक्त राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात आलेली लसीकरण मोहिमेकडेच पाहिलं गेलं आहे.
गेल्या काही आठवड्यात भारतात कोरोनाची स्थिती अत्यंत भीषण झाली आहे. देशात दुसरी लाट आली आहे. अशात आता येत्या काही आठवड्यांमध्ये ही स्थिती आणखी बिघडू शकते असंही IHME च्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे. या सगळ्या तज्ज्ञांनी भारतात वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाचा आणि मृत्यूंबाबत अभ्यास करून मग आपलं मत मांडलं आहे.
महाराष्ट्रात Corona मृत्यूदर घटला आहे… पण मृत्यू नाही.. हे आहे कारण
या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे?
10 मे पासून भारतात कोरोना मृत्यूंचा उच्चांक दिसू शकतो दररोज देशभरात 5 हजार 600 मृत्यू होतील. 12 एप्रिल ते 1 ऑगस्ट या कालावधीत सुमारे 3 लाख 29 हजार मृत्यू होतील असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. वॉशिंग्टनच्या विद्यापीठाने केलेल्या अभ्यास अहवालात हे पण नमूद केलं आहे की भरात सप्टेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत मृत्यूंचं प्रमाण आणि कोरोना रूग्णांचं प्रमाण कमी झालं आहे.
मात्र देशाने हे पाहिलं आहे की मार्च महिन्याच्या मध्यापासून आणि एप्रिल महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या भारतात वाढली तसंच मृत्यूही वाढले. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या वर्षी एप्रिल महिन्यात रूग्णसंख्येत दुप्पट वाढ झालेली दिसून येते आहे.
Corona ची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी का ठरते आहे?
भारतात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात कोरोना रूग्ण हे 71 टक्क्यांनी वाढले तर कोरोना मृत्यूंचं प्रमाण हे 55 टक्के वाढलं. लोकांनी कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळले नाहीत. तसंच लोकांनी अनेक कार्यक्रमांसाठी गर्दी केली आणि मास्क घालणं टाळलं त्यामुळे भारतात कोरोना वाढला आहे असाही उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT