पुण्यात सोमवारी कोव्हिशिल्ड या लसीचा एकही डोस मिळणार नाही. एकाही सेंटरवर कोव्हिशिल्ड या लसीचा डोस मिळणार नाही. कोव्हिशिल्ड या लसीचे डोस संपल्याने पुण्यातल्या एकाही सेंटरवर या लसीचे डोस मिळणार नाहीत अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. 5 जुलै रोजी म्हणजेच सोमवारी पुण्यात कोव्हिशिल्डचा एकही डोस मिळणार नाही असं पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे. कोव्हॅक्सिन या लसीचे डोस 6 सेंटर्सवर उपलब्ध आहेत. मात्र ते देखील फक्त एका सेंटरवर फक्त 200 डोस शिल्लक आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
लस तुटवडा ही गेल्या काही दिवसांपासूनची समस्या आपल्या राज्याला भेडसावते आहे. असं असूनही महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झालं आहे. आज पुणे महापालिका क्षेत्रात 316 नवे रूग्ण आढळले आहेत. तर आज दिवसभरात 329 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 6 रूग्णांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत पुण्यात एकूण 4 लाख 79 हजार 732 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आत्तापर्यंत एकूण 4 लाख 68 हजार 337 रूग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर पुण्यात आत्तापर्यंत 8 हजार 612 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात आज घडीला 2783 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 297 रूग्ण गंभीर आहेत. तर 439 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.
पुण्यात कोरोनाचा कहर माजला होता हे आपण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळीही पाहिलं आहे. अशा सगळ्या स्थितीत जेव्हा राज्यात Break the chain चे तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध आहेत तेव्हा प्रत्येक जिल्ह्यात लसीकरण वेगाने करण्यावर राज्य सरकार भर देतं आहे. अशात पुण्यात लस तुटवडा निर्माण झाला आहे. कोव्हिशिल्ड या लसीचा एकही डोस पुण्यात शिल्लक नाही. तर कोव्हॅक्सिन या लसीचेही सहा सेंटर्सवर मिळून प्रत्येकी 200 डोसच शिल्लक आहेत. अनेक जणांचा दुसरा डोस घेणं बाकी आहे. अशात कोव्हिशिल्ड या लसीच्या दुसऱ्या डोसची मर्यादाही 84 दिवस करण्यात आली आहे. अशात कोव्हिशिल्डचा ही लस सोमवारी उपलब्ध होणार नसल्याने ज्यांचा सोमवारी नंबर लागू शकणार होता त्यांना ही लस उपलब्ध होणार नाही.
ADVERTISEMENT