पुण्यात ३ एप्रिलपासून संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्यापासून हा निर्णय अमलात आणला जाणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद असतील. हॉटेलची पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. संध्याकाळी ६ नंतर पार्सल सेवा सुरू असणार आहे. पुढील सात दिवसांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात दिवसा जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे. PMPL ची बससेवाही सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. आढावा बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पुण्यातले निर्बंध काय आहेत?
खाद्य पदार्थ पुरवणारी केंद्र, रेस्तराँ, बार सात दिवसांसाठी पूर्णतः बंद राहणार. होम डिलिव्हरीची सेवा सुरू राहणारा. मॉल्स, सिनेमा हॉल्स, धार्मिक स्थळं शनिवारपासून बंद
PMPL बसेस शनिवारपासून सात दिवसांसाठी बंद, कॉर्पोरेट कंपन्या, फॅक्टरीज यांसाठीची बससेवा ते पुढील सात दिवस सुरू ठेवू शकतात.
आठवडी बाजार पूर्णपणे बंद
भाजीपाला बाजार, मंडी हे सुरू राहणार पण कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम पाळणं बंधनकारक
लग्नसमारंभ आणि अंत्यसंस्कार हे वगळता इतर सगळे समारंभ रद्द लग्नसमारंभ आणि अंत्यसंस्कार या दोन्हीसाठी मर्यादित संख्या असणं आवश्यक
संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळात कर्फ्यू, अत्यावश्यक सेवांना परवानगी
मुंबईत लॉकडाऊन होणार का? BMC आयुक्त चहल यांची Exclusive मुलाखत
१ एप्रिलला पुणे महापालिका क्षेत्रात ४ हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तसंच गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढतानाच दिसत आहेत. अशात प्रश्न निर्माण होतो आहे तो पुण्यात लॉकडाऊन लागला पाहिजे का? कारण संपूर्ण महाराष्ट्रात पुण्यातच सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्णही आहेत. त्यामुळे या प्रश्नाची चर्चा होते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत आज महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
मागील सात दिवसांमध्ये पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोना रूग्णांची स्थिती
१ एप्रिल
पुणे महापालिका क्षेत्र ४ हजार २०० पॉझिटिव्ह रूग्ण
३१ मार्च
पुणे महापालिका क्षेत्र – ३ हजार २८७ पॉझिटिव्ह रूग्ण
२९ मार्च
पुणे महापालिका क्षेत्र- २ हजार ५५४ पॉझिटिव्ह रूग्ण
२८ मार्च
पुणे महापालिका क्षेत्र-४ हजार ६२५ पॉझिटिव्ह रूग्ण
२७ मार्च
पुणे महापालिका क्षेत्र- ३ हजार ५२२ पॉझिटिव्ह रूग्ण
२६ मार्च
पुणे महापालिका क्षेत्र- ३ हजार ६७९ पॉझिटिव्ह रूग्ण
२५ मार्च
पुणे महापालिका क्षेत्र – ३ हजार ३४० पॉझिटिव्ह रूग्ण
मागील सात दिवसात पुणे महापालिका क्षेत्रातील एकूण रूग्णसंख्या २५ हजार २०७
या सगळ्या संख्याकडे पाहिलं तर पुण्यात लॉकडाऊन लावला पाहिजे अशीच स्थिती सध्या दिसते आहे. पुण्यात कोरोना रूग्णांच्या संख्येचा आलेख उंचावलेलाच आहे.
पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचं प्रमाण हे ३२ टक्के झाले आहे. तसंच रोज पुणे महापालिका आणि जिल्हा असे मिळून ८ हजार किंवा त्यापेक्षा जास्त रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र पुण्यात सध्या तरी लॉकडाऊन लावावा अशीच स्थिती आहे.
ADVERTISEMENT