Cyclone Fengal : देशाच्या सागरी सीमेवर पुन्हा एका चक्रीवादळ धडकणार असून, त्यामुळे आता यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. त्यादृष्टीनं काही राज्यांमध्ये हवाई वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) 'फंगल' चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं हे चक्रीवादळ देशाच्या पूर्वेकडील सागरी सीमेवर हे वादळ धडकणार असून, दूरपर्यंत त्याचे परिणाम दिसून येेणार आहेत. त्यामुळे देशातील 7 राज्यांना सतर्कतेचा इशारा आहे. मात्र महाराष्ट्रावर तुर्तास तरी या वादळाचा फारसा परिणाम होणार नाही. कर्नाटक, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश या राज्यांना सतर्कतेचा इशारा आहे.
ADVERTISEMENT
तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो एअरलाइन्सने चेन्नई विमानतळावरील सर्व उड्डाणं आणि लॅडींग तात्पुरते स्थगित केले आहेत. प्रवासी आणि वैमानिक-केबिन क्रू यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हवामानात सुधारणा झाल्यावर विमानसेवा पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. कंपन्यांनी म्हटलंय की, आम्ही प्रवाशांना रीअल-टाइम अपडेटसाठी त्यांच्या संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधण्यास सांगितलं आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 'फंगल' तामिळनाडूमध्ये अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.विशेषत: तिरुवन्नमलाई जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पुढील दोन दिवस सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा >>Sanjay Shirsat Vs Sanjay Raut : "जे चेहऱ्यावर असतं तेच मनात असतं", शिंदेंच्या नाराजीबद्दल काय म्हणाले शिरसाट?
तामिळनाडूच्या चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील अशी घोषणा तामिळनाडू सरकारनेही केली आहे. विद्यार्थ्यांसाठी कोणतेही विशेष वर्ग किंवा परीक्षा न घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, त्या जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीनुसार शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्यास सांगण्यात आलं आहे.
हे ही वाचा >> Murlidhar Mohol : "माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा...", पहिल्याच टर्ममध्ये केंद्रात मंत्रिपद मिळालेले मोहोळ काय म्हणाले?
चेन्नईच्या प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक डॉ. एस बालचंद्रन यांच्या दिलेल्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कराईकल आणि महाबलीपुरममधील भागांसारख्या किनारपट्टीच्या भागांवर अधिक असेल. वाऱ्याचा वेग ताशी 90 ते 100 किमी प्रतितासापर्यंत पोहोचू शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या सरकारांने नागरिकांना अत्यावश्यकतेशिवाय घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT