दहीहंडीचा उत्सव आज दिवसभर उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाणार यात काही शंकाच नाही. कोरोनामुळे दोन वर्षे दहीहंडी साजरी करता आली नाही. मात्र यावर्षी तसं काहीही वातावरण नाही. दहीहंडी एकदम उत्साहात साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने आजच्या दिवशी सुट्टीही जाहीर केली आहे. या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर पाठवण्याचे मेसेज.
ADVERTISEMENT
दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारून देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरांवर थर
जोशात साजरा करू गोकुळाष्टमीचा सण
हे आला रे आला गोविंदा आला…
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा…
दहीहंडीच्या खूप-खूप शुभेच्छा!
————-
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा… यशोदेच्या तान्ह्या बाळा…
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्वांना कृष्णाच्या बाललीला आणि त्याच्या खोडकर स्वभावाविषयी माहित आहे. कृष्णाला लोणी खाण्याची खूप आवड होती. कृष्णानी गावोगावी अनेक फूट वर टांगलेली लोण्याने भरलेली हंडी फोडली आहे. बालगोपाळांना घेऊन श्रीकृष्ण या लीला करत असे. त्याला त्याचमुळे माखनचोरही म्हटलं जातं. त्याचं प्रतीक म्हणून आजूनही ही परंपराच सुरु आहे. आता कृष्णाचे भक्तही जमिनीपासून कित्येक फूट उंचीवर टांगलेली दहीहंडी फोडतात. याचे खास संदेश तुम्ही सोशल मीडियावर तुम्ही संदेश पाठवू शकता.
विसरून सारे मतभेद, लोभ अहंकार दूर सोडा
सर्वधर्मसमभाव मनात जागून आपुलकीची दहीहंडी फोडा
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा
दहीहंडीचा उत्सव राज्यभरात साजरा करण्यात येतो आहे. मुंबई, ठाण्यात, नवी मुंबईत आणि कल्याण डोंबिवलीत हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात येतो. गोविंदा विविध गाण्यांवर थिरकत आनंदाने आणि उत्साहाने अनेक भागांमध्ये जात उंच उंच थर लावून दहीहंडी फोडत असतात. त्याचा उत्साह दिसून येतो. याच सणाच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना पाठवा खास संदेश
तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दहीहंडी करतो धमाल
असा नटखट आहे नंदकिशोर
दहीहंडी उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा
या आणि अशा प्रकारच्या अनेक शुभेच्छा तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना आणि आप्तस्वकियांना तसंच मित्रांना आजच्या दिवसानिमित्त पाठवू शकता.
ADVERTISEMENT