तालिबानच्या गोळीबारात ठार झालेल्या दानिश सिद्दीकींना मरणोत्तर ‘रेड इंक जर्नालिस्ट ऑफ द इयर पुरस्कार’

मुंबई तक

• 12:48 PM • 30 Dec 2021

बुधवारी मुंबईत प्रेस क्लबतर्फे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात अफगाणिस्तानमध्ये जीव गमावलेले जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर जर्नालिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांनी बुधवारी मुंबई प्रेस क्लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वार्षिक रेड इंक अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन जर्नालिझ पुरस्कार प्रदान केले. एन. व्ही रामन […]

Mumbaitak
follow google news

बुधवारी मुंबईत प्रेस क्लबतर्फे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात अफगाणिस्तानमध्ये जीव गमावलेले जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर जर्नालिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांनी बुधवारी मुंबई प्रेस क्लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वार्षिक रेड इंक अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन जर्नालिझ पुरस्कार प्रदान केले.

हे वाचलं का?

एन. व्ही रामन यांनी सिद्दीकींच्या तपासात्मक आणि प्रभावशाली वृत्त छायाचित्रणातील कामाबाबत प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला. दानिश सिद्दीकी यांच्या पत्नी फ्रेडरिक सिद्दीक यांनी पुरस्कार स्वीकारला. दानिश या काळातील अग्रगण्य छायाचित्र पत्रकार होते. एक चित्र हजार शब्दांचं काम करतं. दानिश यांनी काढलेली छायाचित्र ही कादंबरी होती. असं रामन यांनी म्हटलं आहे.

दानिश सिद्दीकी यांची गणना जगातल्या उत्तम फोटो जर्नालिस्टमध्ये होत होती. त्यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सध्या ते आंतरराष्ट्रीय एजन्सी Reuters सोबत काम करत होते. तसंच अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेली हिंसा आणि त्याबाबतचे फोटो ते पाठवत होते.

दानिश यांच्या मृत्यूनंतर रॉयटर्सने काय म्हटलं होतं?

‘दानिश अत्यंत हुशार पत्रकार होते. त्याचसोबत ते उत्तम पती, पिता आणि सहकाऱ्यांमध्ये आवडते होते. या अत्यंत दुर्दैवी काळात त्यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या पूर्ण संवेदना आहेत.’ असं रॉयटर्सचे फ्रिडेनबर्ग आणि गॅलोनी म्हणाले. युद्धाचं रिपोर्टिंग करताना त्यांच्यावर गोळी झाडली गेली. स्पिन बोल्डकमध्ये तालिबान मागे हटलं त्यावेळी त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि तेव्हा त्यांची तब्बेत ठीक होती असंही रॉयटर्सने म्हटलं आहे.

इंडिया टुडेने अफगाणिस्तानच्या लष्करातील कमांडरच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी फोटोग्राफी करणारे दानिश सिद्दीकी हे अफगाणिस्तानात उफाळलेला संघर्ष कॅमेरात टिपण्यासाठी गेले होते. अफगाणिस्तान लष्करात कमांडर असलेल्या बिलाल अहमद यांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं. तालिबान्यांनी दानिशला फक्त गोळ्याच घातल्या नाहीत तर त्यांना जेव्हा कळलं की दानिश सिद्दीकी भारतीय होते तेव्हा दानिशच्या डोक्यावरून गाडीही घातली. दानिश यांचा मृत्यू झाला आहे हे समजलेलं असतानाही तालिबान्यांनी हे क्रूर कृत्य केलं.

अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी व्यक्त केला होता शोक

अफगाणिस्तानवर आता तालिबानने कब्जा केला आहे. मात्र त्यावेळी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीपदी असलेल्या मोहम्मद अशरफ गनी यांनी दानिश यांच्या हत्येबद्दल दुःख व्यक्त केलं होतं. दानिश यांच्या हत्येची बातमी आली ही बातमी ऐकून मी सून्न झालो आहे असंही गनी यांनी म्हटलं होतं. सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. दानिश सिद्दीकी यांनी त्यांच्या ट्विटर आणि इनस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटोही शेअर केले होते.

कोण होते दानिश सिद्दीकी?

वृत्तवाहिनीसाठी बातमीदार म्हणून दानिश सिद्दीकी यांच्या करिअरची सुरूवात झाली होती. त्यानंतर ते फोटो जर्नालिझमकडे वळले. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी ते फोटो जर्नालिस्ट म्हणून काम करायचे. सप्टेंबर 2008 ते जानेवारी 2010 मध्ये ते इंडिया टुडे ग्रुपसाठी बातमीदार म्हणून काम केलं आहे. मागच्या काही दिवसांपासून दानिश सिद्दीकी सर्वाधिक तणाव असलेल्या अफगाणिस्तानाती कंदहारमधील स्थितीवर रिपोर्टिंग करत होते. काही मिशन्सवर अफगाणिस्तानच्या स्पेशल फोर्सेस ते होते. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. रात्री अफगाणिस्तान स्पेशल फोर्सेसवर तालिबानने हल्ला केला त्यावेळी दानिश सिद्दीकी यांची हत्या झाली.

    follow whatsapp