मुंबई : आगामी दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला बीकेसी मैदानावर एमएमआरडीएने परवानगी दिली आहे. त्याचवेळी दुसऱ्या मैदानासाठी ठाकरे गटाकडून केलेला अर्ज मात्र एमएमआरडीएने फेटाळला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असल्याचे स्पष्ट झाले असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा मेळावा कुठे होणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
यापूर्वी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र शिवसेना पक्ष नेमका कोणाचा याचा निर्णय अद्याप झाला नसल्याने परवानगी नेमकी कोणाला द्यायची हा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे दोन्ही गटांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. परिणामी शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली नाही तर दोन्ही गटांकडून दुसऱ्या पर्यायाची चाचपणी सुरु करण्यात आली होती.
मोहालीमध्ये 60 विद्यार्थीनींचे अंघोळीचे व्हिडीओ व्हायरल; ‘हॉस्टेल’मधीलच तरुणीचं कृत्य
या चाचपणीमध्ये दोन्ही गट पुन्हा एकदा बीकेसी मैदानासाठी आमने-सामने आले. बीकेसीमधील दोन मैदाने कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येतात. यापैकी एका मैदानासाठी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अर्ज केला. तर त्याचवेळी शिवसेनेशी संलग्नित भारतीय कामगार सेनेनेही एमएमआरडीकडे बीकेसीच्या दुसऱ्या मैदानावर शिवसेना मेळावा घेण्याची परवानगी मागितली.
मात्र अखेर या चढाओढीत शिंदे गटाने बाजी मारली आहे. शिंदे गटाने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता ते मैदान 4 आणि 5 ऑक्टोबरससाठी आरक्षित नव्हते, तसेच पहिल्यांदा करण्यात आलेला मागणीचा विचार करुन त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला, तर शिवसेनेने अर्ज केलेले मैदान एका खासगी कंपनीने त्यादिवसासाठी आरक्षित केले आहे, त्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला, असे स्पष्टीकरण एमएमआरडीएने दिले.
‘जलयुक्त शिवार’ची चौकशी बंद करणार : देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या निर्णयावर टीका केली आहे. सावंत म्हणाले, शिवसेनेच्या वतीने आम्ही अर्ज केला होता. एमएमआरडीएने त्यांना परवानगी दिली आहे. पण शिवसेनेला याचा फरक पडणार नाही. पहिले आले म्हणून त्यांना परवानगी दिली. मग याच नियमाने शिवाजी पार्कवर आम्हाला परवानगी मिळायला हवी. आम्ही शिवाजी पार्कसाठी आधी परवानगी मागितली आहे. शिवसेनेची डरकाळी शिवतीर्थावरूनच ऐकायला मिळणार आहे. शिवसेनेची ही परंपरा आहे, ही परंपरा कधी थांबली नाही, असेही सावंत म्हणाले.
ADVERTISEMENT