कोरोनाशी लढा देण्यासाठी DRDO च्या औषधाला मंजुरी, जाणून घ्या औषधाविषयी

मुंबई तक

• 10:24 AM • 08 May 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका आपल्या देशाला बसला आहे. अशात DRDO च्या एका औषधाला तातडीच्या वापराची मंजुरी देण्यात आली आहे. DCGI म्हणजेच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने DRDO ला ही संमती दिली आहे. हे औषध DRDO चं इन्स्टिट्युट ऑफ मेडिसिन अँड सायन्सेस आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युअर बायॉलॉजी यांनी संयुक्तरित्या तयार केलं आहे. […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका आपल्या देशाला बसला आहे. अशात DRDO च्या एका औषधाला तातडीच्या वापराची मंजुरी देण्यात आली आहे. DCGI म्हणजेच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने DRDO ला ही संमती दिली आहे. हे औषध DRDO चं इन्स्टिट्युट ऑफ मेडिसिन अँड सायन्सेस आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युअर बायॉलॉजी यांनी संयुक्तरित्या तयार केलं आहे. 2-deoxy-D-glucose असं या औषधाचं नाव आहे. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी ही डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजला या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

2Deoxy D Glucose च्या क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. ज्या रूग्णांवर या औषधाची चाचणी करण्यात आली त्यांच्या आरोग्यात तातडीने सुधारणा झाल्याचंही दिसून आलं आहे. एवढंच नाही कोरोना झाल्यानंतर ज्या रूग्णांना ऑक्सिजन कमी पडत होता अशा रूग्णांना हे औषध देण्यात आलं तेव्हा त्यांची ऑक्सिजनची गरजही कमी झाली. असाही दावा करण्यात आला आहे की या औषधामुळे कोरोना रूग्णाचा रिपोर्ट इतर रूग्णांच्या तुलनेत लवकर निगेटिव्ह येतो. डिआरडीओचे वैज्ञानिक एप्रिल 2020 मध्ये या औषधावर संशोधन करत होते. मे 2020 मध्ये या औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी मंजुरी देण्यात आली होती.

कोरोना विषाणूसंदर्भातील समज आणि त्यामागील सत्यता

क्लिनिकल ट्रायल्समध्ये काय समोर आलं?

देशभरातल्या विविध रूग्णालयांमधे हे औषध पाठवण्यात आलं होतं. ट्रायल बीचा दुसरा टप्पा हा सहा रूग्णालयांमध्ये तर ट्रायल टू बीचा टप्पा हा 11 रूग्णालयांमध्ये पाठवण्यात आला होता. 110 रूग्णांना हे औषध देण्यात आलं. ट्रायलमध्ये जे रूग्ण सहभागी झाले होते ते इतर रूग्णांपेक्षा सुमारे तीन दिवस आधी बरे झाले असं दिसून आलं.

फेज थ्री

डिसेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत देशभरातल्या 27 रूग्णालयांमध्ये हे औषध पाठवण्यात आलं होतं. यावेळी 220 रूग्णांना हे औषध दिलं गेलं. फेज थ्रीमधली चाचणी ही दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधील रूग्णालयांमध्ये असलेल्या रूग्णांवर करण्यात आली.

ज्या रूग्णांना 2Deoxy D Glucose हे औषध देण्यात आलं होतं. त्यापैकी सुमारे 42 टक्के रूग्णांना ऑक्सिजनची भासणारी कमतरता ही तिसऱ्या दिवशी संपली. हा ट्रेंड 65 वर्षे आणि त्यावरील रूग्णांमध्ये पाहण्यास मिळाला हे विशेष आहे.

2Deoxy D Glucose हे औषध पावडरच्या स्वरूपात आहे. हे औषध पाण्यात मिसळून घ्यायचं आहे. शरीरातले व्हायरस आणि त्यांची वाढ रोखण्याचं काम हे औषध करतं. सध्या देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे कारण कोरोनाचा फैलावही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. अशात ऑक्सिजनची कमतरताही रूग्णांना भासते आहे. आता नवं आलेलं हे औषध 2Deoxy D Glucose हे रूग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं यात काही शंका नाही.

    follow whatsapp