PM मोदींसमोर ठाकरे पिता-पुत्रांचे वाभाडे; शिंदेंचं कौतुक : फडणवीस म्हणाले…

मुंबई तक

19 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:15 AM)

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (१९ जानेवारी) मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांच भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी यांची बीकेसी मैदानावर जाहीर सभाही पार पडली. (dcm devendra fadnavis talk on uddhav thackeray and aditya thackeray in […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (१९ जानेवारी) मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांच भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी यांची बीकेसी मैदानावर जाहीर सभाही पार पडली. (dcm devendra fadnavis talk on uddhav thackeray and aditya thackeray in front of narendra modi)

हे वाचलं का?

याच सभेत पंतप्रधान मोदी यांच्या भाषणापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भाषण झाली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांसमोरच शिवसेना (UBT) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे वाभाडे काढले. तर मुख्यमंत्री शिंदे यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते : फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे आणि मुंबईकरांचे पंतप्रधान मोदींवर विशेष प्रेम असल्याचं सांगितलं. मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या लोकप्रियतेबाबत कुठली स्पर्धा होऊ शकत नाही. मात्र त्यांची लोकप्रियता मोजायची झाली तर ती मुंबईत सर्वाधिक आहे. हे दाव्याने सांगू शकतो, असंही फडणवीस म्हणाले.

ठाकरे पिता-पुत्रांचे वाभाडे, शिंदेंचं कौतुक :

  • काही लोकांच्या गद्दारीमुळे जनतेच्या मनातील सरकार बनू शकलं नाही :

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदीजी २०१९ मध्ये तुम्ही इथूनच सांगितलं होतं की पाच वर्षांत डबल इंजिन सरकारने चांगलं काम केलं. त्यामुळे पुन्हा या सरकारला निवडून द्या. तुमच्या शब्दावर विश्वास ठेऊन जनतेने या सरकारला पुन्हा निवडून दिलं. पण काही लोकांनी गद्दारी केली, बेईमानी केली. त्यामुळे जनतेचं सरकार बनलं नाही.

पण बाळासाहेबांच्या कट्टर अनुयायाने हिंमत दाखविली आणि तुमच्या आशीर्दावाने पुन्हा एकदा जनतेच्या मनातील सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने रुळावर आला. आज आपण अनेक पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांच उद्घाटन आणि लोकार्पण होतं आहे. पण यात सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे स्वनिधी योजना.

  • स्वनिधीला मागच्या सरकारने स्थगिती दिली

कोरोना काळात पंतप्रधानांनी फुटपाथ दुकानदार, गातगाडीवाले, पानपट्टीवाले अशा सगळ्यांचा विचार करुन त्यांच्यासाठी स्वनिधीची योजना आणली. पण तत्कालिन सरकारने एका बैठकीत निर्णय घेऊ या योजनेला स्थगिती दिली. पण परत सरकार आल्यानंतर आम्ही केंद्रीय मंत्र्यांच्या अखत्यारित बैठक घेतली आणि पुन्हा ही योजना चालू करण्याबाबत ठरवलं. आता एक लाख १५ हजार जणांना स्वनिधीच्या योजनेतून पैसा मिळत आहे. आता मुंबईसह इतरही ठिकाणीही याचे पैसे मिळणार आहेत.

ज्या ज्या योजनांचा भूमिपुजन केलं, त्याचं उद्घाटनही तुम्हीच केलं आहे. ही नवीन संस्कृती तुम्ही आणली आहे. मेट्रोचं भूमिपुजन आणि उद्घाटन तुम्ही करत आहात, याचा मला आनंद होत आहे.

  • यांनी फिक्स डिपॉजिट केले, स्वतःची घर भरली :

मुंबईत रोज हजारो कोटी लिटर पाणी समुद्रात सोडलं जातं होतं. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर महापालिकेला सांगितलं असं करता येणार नाही. त्यावर त्यांनी काही नियम मागितले. आम्ही केंद्रातील सरकारच्या मदतीने एका वर्षात हे नियम दिले. त्यानंतर काम होणं अपेक्षित होतं. पण त्यानंतरही तीन वर्ष BMC काहीच होऊ शकली नाही. कारण काय तर हिस्सेदारी. यांनी फिक्स डिपॉजिट केले, स्वतःची घर भरली. पण मुंबईकरांना शुद्ध पाणी दिलं नाही. तुमच्या सरकारमुळेच हे शक्य झालं आहे.

  • प्रत्येक वर्षी तेच रस्ते. त्यातून भ्रष्टाचार :

सोबत ६ हजार कोटींचे रस्ते करत आहोत. कोणी विचारलं कॉंक्रिटचे रस्ते कशासाठी? आम्ही चार वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांचं परिक्षण केलं होतं. तेव्हा आमच्या लक्षात आलं की रस्त्यांवर खालची लेयरच नाही. प्रत्येक वर्षी तेच रस्ते. त्यातून भ्रष्टाचार. पण आम्ही ठरवलं, आता असा रस्ता तयार करायचा की पुढचे ४० वर्ष रस्त्यावर खड्डाच पडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि आता त्याची सुरुवात होत आहे.

    follow whatsapp