जितेंद्र आव्हाड यांना अटक केलेल्या उपायुक्त विनयकुमार राठोड यांची बदली

मुंबई तक

• 02:26 PM • 12 Nov 2022

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची शनिवारी ठाणे न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली. यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले. तसंच आपल्या अटकेत पोलिसांची काहीही चुकी नाही, त्यांची हतबलता स्पष्ट दिसत होती, असं आव्हाड यांनी म्हटलं. यापूर्वीही फेसबुक पोस्ट अन् माध्यमांशी बोलताना त्यांनी अशाच प्रकारची विधानं केली होती. अशातच आता आव्हाड यांना […]

Mumbaitak
follow google news

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची शनिवारी ठाणे न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली. यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले. तसंच आपल्या अटकेत पोलिसांची काहीही चुकी नाही, त्यांची हतबलता स्पष्ट दिसत होती, असं आव्हाड यांनी म्हटलं. यापूर्वीही फेसबुक पोस्ट अन् माध्यमांशी बोलताना त्यांनी अशाच प्रकारची विधानं केली होती. अशातच आता आव्हाड यांना अटक केलेल्या उपायुक्त विनयकुमार राठोड बदली झाल्याची बातमी समोर येत आहे.

हे वाचलं का?

पोलीस उपायुक्त विनय कुमार राठोड यांची झोन 5 मधून वाहतूक विभागात बदली करण्यात आली असल्याची माहिती आहे. आज दुपारी त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. याबाबत जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, तुम्हाला ठाणे ट्राफिक किती महत्वाचं आहे, माहित नाही. त्यांना हे बक्षीस मिळालं आहे असं समजा.

आव्हाड काय म्हणाले होते?

काल अटकेची माहिती देताना आव्हाड यांनी ट्विटरवरुन पोलिसांची हतबलता दिसत असल्याचं म्हटलं होतं. ते म्हणाले होते, आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो

मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत, चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.

त्यानंतर माध्यमांशी बोलतानाही आव्हाड यांनी सातत्याने पोलीस हतबल असल्याचं सांगत होते. काल माध्यमांशी बोलताना आपल्या अटकेत DCP राठोड यांची काही चुकी नाही, असं आव्हाड म्हणाले होते. तर आजही माध्यमांशी बोलताना, आपल्या अटकेत पोलिसांची काहीही चुकी नाही. ते हतबल होते, त्यांच्यावर दबाव होता, त्यांची हतबलता दिसत होती, असं ते म्हणाले. आव्हाड यांच्या या दाव्यानंतर आता डीसीपी राठोड यांची बदलीची बातमी समोर येत आहे.

    follow whatsapp