Mumbai CP: ‘मुंबईच्या पोलीस आयुक्तांबद्दल CM निर्णय घेणार’, बदलीबाबत मोठं वक्तव्य

मुंबई तक

• 09:44 AM • 17 Mar 2021

मुंबई: ‘मुंबईच्या पोलीस आयुक्तांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेणार आहेत. तसा त्यांना संपूर्ण अधिकार देखील आहे.’ अशी प्रतिक्रिया राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली होणार का? या विषयाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील वरिष्ठ नेत्यांची आज (17 मार्च) सह्याद्री अतिथीगृहावर बैठक […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: ‘मुंबईच्या पोलीस आयुक्तांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेणार आहेत. तसा त्यांना संपूर्ण अधिकार देखील आहे.’ अशी प्रतिक्रिया राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली होणार का? या विषयाने पुन्हा एकदा जोर धरला आहे.

हे वाचलं का?

महाविकास आघाडी सरकारमधील वरिष्ठ नेत्यांची आज (17 मार्च) सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. याच बैठकीनंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी माहिती दिली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीत वाझेंविषयी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

दुसरीकडे ‘वर्षा’वर मात्र अनेक घडामोडी सुरु आहेत. थोड्या वेळापूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली असल्याचं समजतं आहे. यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त बदलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sachin Vaze Case: ‘वर्षा’वर मध्यरात्रीपर्यंत खलबतं, CMची ‘यांच्यासोबत’ 4 तास चर्चा

मध्यरात्रीपर्यंत मुख्यमंत्र्यांनी केली गृहमंत्री आणि परमवीर सिंगाशी चर्चा

दरम्यान, काल (17) रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, डीजीपी हेमंत नागराळे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याशी चर्चा केली. काल रात्री 8 वाजता सुरु झालेली त्यांची ही चर्चा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु होती.

या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली किंवा कोणते निर्णय घेण्यात आले याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एवढंच नव्हे तर या बैठकीनंतर गृहमंत्री किंवा दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियासमोर येऊन कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे या बैठकीत निश्चितच काही तरी महत्त्वाचे निर्णय घेतले गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sachin Vaze यांनीच स्वत:च्या सोसायटीचे CCTV फुटेज केले डिलीट: NIA सूत्र

सचिन वाझे प्रकरणावर राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांवर आता विरोधकांवरुन सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्र्यांवर मोठा दबाव आहे. अशावेळी परमवीर सिंग यांना मुंबईचं आयुक्त पद गमवावं लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीबाबत सस्पेंस अद्यापही कायम आहे. दरम्यान, सरकारकडून अद्याप तरी कोणत्याही बदलीबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

‘Sachin Vaze प्रकरणामुळे मविआ सरकार पडणार नाही, विरोधकांनी भ्रमात राहू नये’

NIAच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर ज्या घडामोडी घडत आहेत ते पाहता मुख्यमंत्र्यांनी आता याप्रकरणी पूर्ण लक्ष घातलं आहे. त्यामुळे आता ते याबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीबाबत काय म्हणाले होते अजित पवार?

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं की, तूर्तास तरी कुणाचीही बदली करण्यात येणार नाही. ‘मनसुख हिरेन प्रकरण असो किंवा अँटेलिया स्कॉर्पिओ प्रकरण असो कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जोपर्यंत कोणाच्याही विरोधात पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत प्रत्येक जण आपल्या पदावर काम राहिल.’ असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क करण्यात आलेल्या कारप्रकरणी सचिन वाझे यांना NIA ने अटक केली आहे. ज्यावेळी ही कार पार्क करण्यात आली तेव्हा सचिन वाझे देखील तिथे उपस्थित होते असा एनआयएचा दावा असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. अशावेळी आता या सगळ्या प्रकरणात राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

१३ मार्चच्या रात्री NIA ने सचिन वाझेंना अटक केली. या अटकेनंतर विविध तर्क-वितर्क राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली केली जाईल, गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागेल अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात याबाबत नेमके निर्णय पाहायला मिळू शकतात.

    follow whatsapp