शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप लांबणीवर?, मंत्र्यांच्या नाराजीकडे विशेष लक्ष

ऋत्विक भालेकर

• 04:14 PM • 10 Aug 2022

मुंबई: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला आहे. १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. अनेक दिवसांपासून शिंदे- फडणवीसांवर दोघांचेच मंत्रिमंडळ म्हणून आरोप होत होते. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत चर्चा आहे. परंतु शपथ घेतलेल्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार यासाठी थोडं थांबावं लागणार आहे. कारण खातेवाटप लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शपथ घेतलेल्या […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला आहे. १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. अनेक दिवसांपासून शिंदे- फडणवीसांवर दोघांचेच मंत्रिमंडळ म्हणून आरोप होत होते. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत चर्चा आहे. परंतु शपथ घेतलेल्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार यासाठी थोडं थांबावं लागणार आहे. कारण खातेवाटप लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

शपथ घेतलेल्या मंत्र्यांकडून मागितले ऑप्शन

आज मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना प्रत्येकी दोन ते तीन खात्यांचे ऑप्शन मागितल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी निवासस्थानाबद्दल देखील प्रत्येक मंत्र्यांकडून दोन ते तीन बंगल्यांचे ऑप्शन मागितले आहेत. कुणाला कुठलं खातं द्यायचा आणि कुठला बंगला द्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र बसून घेणार आहेत. खाते वाटप आणि बंगले वाटप करताना मंत्र्यांची नाराजी होऊ नये यासाठी शिंदे आणि फडणवीस यांचा प्रयत्न असणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शिंदे सरकारचा अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला आहे. १८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. त्यामध्ये शिंदे गटातील ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. गेल्या एक महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेच काम करत होते. सध्याच्या सरकारचा पेच हा कोर्टामध्ये आहे त्याचा निकाल अजून यायचा आहे. शपथविधी होण्याअगोदर विरोधी पक्ष सतत टीका करत होते की कोर्टाच्या निकालामुळे शपथविधी लांबवला जात आहे. आता शपथविधी झालेला आहे, कोणाकडे कोणते मंत्रिपद जाईल हे अजून निश्चित झालेले नाही.

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची बच्चू कडूंची कबुली

मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाराज आहात का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी बच्चू कडू यांना विचारला. या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू म्हणाले ‘ थोडी नाराजी आहे, नाराजी नाही असं नाही. परंतु इतकीही नाराजी नाही की, शिंदे गट सोडून इतर पक्षात जाणार, अशा स्पष्ट शब्दात बच्चू कडूंनी मंत्रिपद न मिळाल्याच्या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया दिली. क्षणिक नाराजी आहे, पण अजून पुढचा मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. त्यात जर जागा मिळाली नसती तर वेगळी गोष्ट असती, बच्चू कडू म्हणाले.

    follow whatsapp