राजधानी दिल्लीl प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू आहे. कोरोनाच्या निर्बंधांमध्ये यावर्षीही हा दिन साजरा होणार आहे. प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. त्यासाठी जो सोहळा होणार आहे त्या सोहळ्यात दरवर्षी महत्त्व असतं ते पण अमर जवान ज्योतीचं. दिल्लीच्या इंडिया गेट या ठिकाणी असलेल्या वीर जवानांच्या आठवणरूपी अमर जवान ज्योतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरं तर ही ज्योतच इंडिया गेटची ओळख मानली जाते. पण आता मात्र ही ओळख बदलणार आहे. आता अमर जवान ज्योती इंडिया गेटवर नाही, तर राष्ट्रीय युद्ध स्मारकात प्रज्ज्वलित केली जाणार आहे. काही वेळापूर्वीच ही ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पाकिस्तानविरुद्धच्या 1971 च्या युद्धाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. हेच औचित्य साधून अमर जवान ज्योतीला राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ नेण्याच्या ज्योतिमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आधी इंडिया गेटमध्ये असलेल्या अमर जवान ज्योतीला राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ तेवणाऱ्या ज्योतीत विलीन केलं जाणार आहे. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं लोकार्पण केलं होतं.
अमर जवान ज्योतीतील मूळ ज्योत याच ज्योतिमध्ये विलीन करून प्रज्ज्वलित केली जाईल हा निर्णयही त्याचवेळेस घेण्यात आला होता. राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आता एक नवीन अमर जवान ज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्याआधी प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती, लष्कर प्रमुख आणि मुख्य अतिथी अमर जवान ज्योतीपाशी जाऊनच शहिदांना आदरांजली वाहतात. नंतर हा सोहळा राष्ट्रीय युद्ध स्मारकापाशी केला जाऊ लागला.
इंडिया गेटजवळ आता ही ज्योत आजनंतर कधीही दिसणार नाही. वॉर मेमोरियलमध्ये प्रज्ज्वलित होणाऱ्या ज्योतीमध्ये ही ज्योत विलीन केली जाणार आहे. पाकिस्तानसोबत 1971 मध्ये युद्ध झाल्याच्या 50 वर्षांच्या निमित्ताने राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्यात आलं आहे. या ठिकाणी जी ज्योत प्रज्ज्वलित झाली आहे त्याच ज्योतीतच अमर जवान ज्योतीचं विलिनीकरण केलं जाणार आहे.
राष्ट्रीय युद्ध स्मारकात आत्तापर्यंतच्या युद्धात आणि इतर मोहिमांमध्ये शहीद झालेल्या 26 हजार जवानांची नावं कोरण्यात आली आहेत. अमर जवान ज्योतीचं राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलिनीकरण करण्यात येणाऱ्या मोदी सरकारच्या निर्णयावर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला आहे. मोदी सरकारने शहिदांचा अपमान केला आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. तर आम्ही ही ज्योत विझवलेली नाही तर दुसऱ्या ज्योतीत विलीन केली आहे असं उत्तर सरकारने दिलं आहे.
ADVERTISEMENT