Delhi Metro Bikini girl video Viral : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक तरूणी बिकनीत (metro bikini girl) ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसली आहे.तिला पाहून इतर प्रवाशांना धक्का बसला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. (delhi metro bikini girl viral video fans are crazy reacting on video)
ADVERTISEMENT
आजकाल मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होण्याचा ट्रेंडच सुरु झाला आहे. अनेकदा मेट्रोत गाणे गाण्याचा, डान्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात काही धक्कादायक व्हिडिओही समोर येत असतात. असाच व्हिडिओ आता समोर आला आहे.या व्हिडिओत एक तरूणी बिकनी घालून (bikini girl viral video) मेट्रोतून प्रवास करताना दिसली आहे. तिच्या या प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हे ही वाचा : पती झोपलेला.. बायको घरात परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत; झोपेतून उठताच…
व्हिडिओत काय?
व्हायरल व्हिडिओत (Viral video) तरूणी मेट्रोच्या सीटवर बसली आहे. तिने तिच्या मांडीवर बॅग घेतली आहे. या दरम्यान तिने कोणता ड्रेसअप केला आहे, हे दिसत नाही. मात्र ज्यावेळेस ही तरूणी सीटवरून उठते, त्यावेळेस ती बिकनी (bikini girl viral video)परीधान करून आल्याचे दिसते. तरूणीचा बिकनी अवतारातील मेट्रोतला प्रवास पाहून सर्वच प्रवाशी आश्चर्यचकीत होतात. तसेच अनेक प्रवाशांनाच तिच्याकडे बघण्यास लाज वाटत आहे.
दरम्यान हा व्हिडिओ तरूणीच्या समोर बसलेल्या एकाने कॅमेरात कैद केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ इँटरनेटवर टाकण्यात आला होता. आता हा व्हिडिओ सोशल मीड़िआवर व्हायरल झाला आहे. बरखा त्रेहान नावाच्या एका महिलेने हा व्हिड़िओ ट्वीट करून शेअर केला आहे. हे महिला सक्षमीकरणाचे उदाहरण असेल तर तरूण पिढीच्या मुली अशा सशक्तीकरणाचा बळी ठरू शकतात,असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. एका युझरने म्हटलेय, दिल्ली मेट्रोत इतकी गरमी होते का मी कधी अनुभव घेतला नाही. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या महिलेला कॉपी करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे, असे दुसऱ्या युझरने म्हटले आहे. सध्या या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
हे ही वाचा : मित्रानेच केला मित्राचा घात…झोपलेल्या बेस्ट फ्रेंडच्याच प्रायव्हेट पार्टवर…
या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.तसेच तरूणीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी देखील अनेकदा असे प्रकार घडले आहे.सध्या ही बिकनी गर्ल या प्रकारामुळे चर्चेत आली आहे.
डिएसआरसी काय म्हणाले?
आम्ही प्रवाशांकडून सामाजिक भान आणि प्रोटोकॉलचे पालन करणे अपेक्षित समजतो. ज्याला समाजात स्विकारलं जाईल. प्रवाशांनी असा कोणताही ड्रेस परिधान केला नाही पाहिजे, अशी कोणतीही अॅक्टीवीटी केली नाही पाहिजे,ज्यामुळे प्रवाशांच्या भावना दुखावल्या जातील, असे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने म्हटले आहे.
ADVERTISEMENT