कर्नाटकात पुन्हा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना, शिवसेनेनं कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा ध्वज जाळला

मुंबई तक

• 01:57 AM • 22 Dec 2021

स्वाती चिखलीकर, सांगली बंगळुरूतल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना ताजी असतानाच होणगावमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पुन्हा विटंबना करण्यात आली. या घटनेचे संतप्त प्रतिसाद मिरजेत उमटले आहेत. शिवसेनेने कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या ध्वजाची होळी केली. याबाबतची बातमी मिरजेत धडकताच शिवसेना रस्त्यावर उतरली, बेळगावमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील महाराणा प्रताप चौकात शिवसेनेकडून कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या ध्वजाची […]

Mumbaitak
follow google news

स्वाती चिखलीकर, सांगली

हे वाचलं का?

बंगळुरूतल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना ताजी असतानाच होणगावमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पुन्हा विटंबना करण्यात आली. या घटनेचे संतप्त प्रतिसाद मिरजेत उमटले आहेत. शिवसेनेने कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या ध्वजाची होळी केली. याबाबतची बातमी मिरजेत धडकताच शिवसेना रस्त्यावर उतरली, बेळगावमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील महाराणा प्रताप चौकात शिवसेनेकडून कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या ध्वजाची होळी करण्यात आली, कर्नाटक सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

17 डिसेंबरला बंगळुरूमध्ये काय घडलं?

बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा अत्यंत संतापजनक घटना कर्नाटक राज्यातील बंगळुरु मध्ये घडला. या घृणास्पद प्रकारामुळे संपूर्ण शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली. काही समाजकंटकांनी 17 डिसेंबरच्या रात्री पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेमुळे राज्यातील शिवप्रेमी देखील संतापले.

मागील अनेक महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे, त्यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्नही कर्नाटकात काही संघटना आणि समाजकंटकांकडून वारंवार केला जात होता. या सगळ्या प्रकाराबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच बेळगावातल्या होणगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेनेने कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या ध्वजाची होळी करण्यात आली.

कर्नाटकातील घटनेचे नवी मुंबईत उमटले पडसाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

बंगळुरूत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, महाराष्ट्रात पडसाद

बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचे पडसाद राज्यात उमटले. कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आलं. तर बेळगाव शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून 144 कलम लागू करण्यात आले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात शिवसैनिकांनी कर्नाटकात जाणाऱ्या बसेसवर भगव्या अक्षरात शिवसेना, जय महाराष्ट्र लिहिले. तर अनेक ठिकाणी काळा स्प्रे मारून निषेध देखील नोंदवला. यावेळी कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली.

    follow whatsapp