BJP : फडणवीस-मुंडेंचा एकाच गाडीतून प्रवास; काय कारण?

मुंबई तक

11 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:04 AM)

Devendra Fadnavis | Pankaja Munde News : नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच पक्षात राहूनही एकमेकांशी पटत नसल्याची चर्चा असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज (शनिवारी) एकाच गाडीतून प्रवास केला. भाजप प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक नाशिकमध्ये होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बिगुल वाजविला […]

Mumbaitak
follow google news

Devendra Fadnavis | Pankaja Munde News :

हे वाचलं का?

नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच पक्षात राहूनही एकमेकांशी पटत नसल्याची चर्चा असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज (शनिवारी) एकाच गाडीतून प्रवास केला. भाजप प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक नाशिकमध्ये होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बिगुल वाजविला जाईल. (Devendra Fadnavis and pankaja Munde travelled in one car)

याच बैठकीला येताना मुंडे-फडणवीस एकाच गाडीतून आले. याबाबत पंकजा मुंडे यांना विचारलं असता, आम्ही एकाच हॉटेलमध्ये थांबलो होतो. माझी गाडी मागे होती आणि त्यांची गाडी पुढे लागली होती. त्यामुळे आम्ही एकाच गाडीतून आलो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, यावेळी त्यांनी इतरही अनेक विषयावर भाष्य केलं.

शशिकांत वारिशे: फडणवीसांचा मोठा निर्णय, राऊतांच्या पत्रानंतर पोलिसांना दिले आदेश

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

मी भाजपच्या बैठकीत उपस्थित होते. कारण मी कोअर कमिटीत आहे. पक्षाची राष्ट्रीय सचिव आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची नियमानुसार राज्याची कार्यकारणी व्हायला पाहिजे, ती कार्यकारणी आता झाली. चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच ही कार्यकारणी होती. अनेक विषयांवर चर्चा झाली, अजून चर्चा होणार आहे.

राजकीय प्रस्तावांवर चर्चा झाली. याशिवाय येणारे आमचे आगामी जे प्रोग्राम आहेत किंवा युवा वारियर्स असतील, बूथ रचना असेल या विविध कार्यक्रमांबद्दल चर्चा झाली. युवा मोर्चा कसा जास्तीत जास्त सक्रिय व्हावा किंवा युवा वर्ग कसा मतदार आमच्याकडे आकर्षित व्हावा याच्यासाठी भारतीय जनता पक्षाने काय करावं, यावर चर्चा झाली, असंही त्या म्हणाल्या.

Ravikant tupkar : पोलिसाच्या वेशात आले अन् तुपकरांनी अंगावर ओतलं पेट्रोल

बैठकीत काय झालं?

दरम्यान, या बैठकीबाबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय प्रस्ताव यांनी मांडला. पंकजा मुंडे, आशिष शेलार यांनी अनुमोदन केले. महाराष्ट्र पुन्हा प्रगती पथावर आणल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे राज्य कार्यकारिणीत अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसला जाऊन एक लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे काम केलं याबाबतही शेलार यांनी भाष्य केलं.

आरे कारशेडला विरोध, वाझे प्रकरण, केंद्र सरकारच्या विरोधातील बोंबाबोंब करण्याचं काम ठाकरे सरकारने केलं. मात्र एकही लोकहिताचं काम केलं नाही. आम्ही पेट्रोल डिझेल दर स्वस्त करण्याचा पहिला निर्णय आम्ही घेतला. मेट्रोचं जाळं विस्तारित केलं. आरे कारशेड स्थगितीमुळे सामान्य जनतेला १० हजार कोटींचा अधिकचा भुर्दंड सोसावा लागला, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोकरीत आणि शिक्षणातील आरक्षण घालवण्याचं पाप ठाकरे सरकारनं केलं. आता आम्ही पुन्हा आरक्षणांतर्गत इतर सवलती देण्याचा निर्णय घेत आहोत. १४ महिन्यात गुंतवणूक समितीची एकही बैठक झाली नाही, अशीही टीका शेलार यांनी केली.

    follow whatsapp