Devendra fadnavis speech On 74th Republic Day : 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी नागपूर (Nagpur) येथे झेंडावंदन (flag hoisting ceremony) केलं. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “आज दिल्ली (Delhi) येथे होत असलेल्या परेडमध्ये सामान्य माणसाला पहिल्या रांगेत जागा मिळाली आहे. आपल्या लोकशाहीला हेच अभिप्रेत आहे की, जो समाजातला शेवटचा व्यक्ती आहे तो व्यक्ती आपल्याला पहिल्या रांगेत आणायचा आहे.” (Devendra fadnavis did flag hoisting ceremony on republic day 2023)
ADVERTISEMENT
प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपुरातील कस्तुरचंद पार्क मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजावंदन पार पडले.
“भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधानाने जी लोकशाहीची मूल्ये आपल्याला सांगितली जी समता आणि बंधुता आपल्याला सांगितली. त्याचा मूळ मंत्र घेऊन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला समानतेनं वागणूक देत प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, अशा प्रकारची रचना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केली, याचा आज आपल्या सगळ्यांना मनापासून गर्व आहे.”
“भारताला G20 चे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. जगातील प्रमुख देश, प्रगतिशील देश आहेत तेही भारताच्या नेतृत्वामध्ये जी20 च्या माध्यमातून जगाला पर्यावरणाचा संदेश देऊ इच्छितात”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“कुटुंबकम ही आमची सांस्कृतिक विरासत आहे. ती आता जगाने स्वीकारली आहे. जी 20 च्या मिटिंगसाठी नागपूर हे सज्ज आहे आणि जगातून येणाऱ्या लोकांना नागपूर बघितल्यावर हेवा वाटावा अशा प्रकारचं नागपूर आम्ही त्यांच्यासमोर प्रेझेंट करणार आहोत”, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा मंत्र दिला -देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नागपूर हे मिनी इंडिया आहे. देशातील सर्व राज्यातील लोक या नागपूरमध्ये मोठ्या संख्येत गुण्या गोविंदांना नांदताना दिसतात. सर्व जाती, धर्माचे लोक हे गुण्या गोविंदांना नागपुरात राहतात. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान आपण अंगीकारलं. त्या संविधानाने खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाला जगण्याचा मंत्र दिला, जे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. त्या संविधानामुळेच आपली प्रगती आहे.”
“आपल्या पंतप्रधान संविधानाची शपथ घेऊन त्या ठिकाणी कामावर जातात. आपण या सगळ्यांनी संविधानिक मूल्यांची जपणूक करणे हे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे.एकनाथ शिंदे आणि आमचे सरकार हे अमृतकालात विकास कालच काम करेल याची मी ग्वाही देतो”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि आमचे सरकार हे अमृतकालात विकास कालच काम करेल याची मी ग्वाही देतो”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT