“हे लोक मला वेड्यात काढायचे”, देवेंद्र फडणवीस नगरच्या सभेत असं का बोलले?

मुंबई तक

• 07:16 AM • 11 Mar 2023

Devendra Fadnavis Karjat Speech : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर पलटवार केला. “आपल्याच तिजोऱ्या भरण्याचा प्रयत्न केला, तर पैशांची कमतरता पडते”, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून डिवचलं. तसेच समृद्धी महामार्गाबद्दलचा अनुभव सांगताना फडणवीसांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा उल्लेख केला. कर्जत येथे झालेल्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना देवेंद्र […]

Mumbaitak
follow google news

Devendra Fadnavis Karjat Speech : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर पलटवार केला. “आपल्याच तिजोऱ्या भरण्याचा प्रयत्न केला, तर पैशांची कमतरता पडते”, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून डिवचलं. तसेच समृद्धी महामार्गाबद्दलचा अनुभव सांगताना फडणवीसांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा उल्लेख केला.

हे वाचलं का?

कर्जत येथे झालेल्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जनतेच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सगळ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचं काम केलं. शेतकरी केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांवर सातत्याने संकट येताहेत. सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना 700 हजार कोटी मदत म्हणून दिले.”

साडेचार कोटी दिलेत, 1000 कोटींची तरतूद केलीये -देवेंद्र फडणवीस

मेळाव्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कधी कधी असं म्हणतात की, लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही. मागच्या सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार देऊ अशी दोनदा घोषणा केली, पण पूर्ती केली नाही. आपलं सरकार आल्यानंतर साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 50-50 हजार रुपये दिले. साडेचार हजार कोटी रुपये दिले. अजून अडीच लाख शेतकरी बाकी आहेत, 1000 कोटींची तरतूद केली आहे. त्यांच्याही खात्यात आपण पैसे देणार आहोत.”

BJP चा विश्वासघात केला म्हणणारे बच्चू कडू
उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात गेलेच का होते?

“आपला अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारा आहे. पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजना आणली, त्याला जोड म्हणून नमो शेतकरी महासन्मान योजना आणली आणि केंद्राच्या 6 हजारांबरोबर महाराष्ट्र सरकारही 6 हजार रुपये 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे”, अशी ग्वाही फडणवीसांनी यावेळी दिली.

विरोधकांवर टीकास्त्र, देवेंद्र फडणवीस कर्जतच्या सभेत काय म्हणाले?

बजेटमध्ये करण्यात आलेल्या घोषणांवरून विरोधकांनी सरकारला सवाल केला होता. इतका पैसा कसा उभा करणार असं विरोधकांकडून विचारण्यात आलं.त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले,”आमचा विरोध पक्ष विचारतोय की तुम्ही योजना तर घोषित केल्या, पण पैसा आणणार कुठून? पैसा आहे. योग्य प्रकारे वापरला तर त्याठिकाणी पैसा निश्चित असतो. महाराष्ट्रासारख्या राज्याला कधी अडचण नसते. तोच पैसा भ्रष्टाचारात घालवला आणि केवळ स्वतःचा स्वार्थ पाहिला. आपल्याच तिजोऱ्या भरण्याचा प्रयत्न केला, तर पैशांची कमतरता पडते.”

किरीट सोमय्यांना दणका, हसन मुश्रीफांना दिलासा! उच्च न्यायालयात काय घडलं?

‘ते म्हणायचे की वेडा माणूस आहे’, देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

समृद्धी महामार्गाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले,”विखे पाटील साहेब, जेव्हा मी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग घोषित केला, तेव्हा हे लोक मला वेड्यात काढायचे. ते असं म्हणायचे की वेडा माणूस आहे. दहा हजार कोटींचा मार्ग होऊ शकत नाही, हा 50 हजार कोटींचा मार्ग तयार करायला निघाला. तीन साडेतीन वर्षात 50 हजार कोटींचा मार्ग एकनाथ शिंदे आणि मी करून दाखवला. हा मार्ग सहा महिन्यात पूर्ण सुरू होईल.”

“पैसा हा महत्त्वाचा नसतो, महत्त्वाचं असतं की, तुमची इच्छाशक्ती आहे का? आमच्याकडे इच्छाशक्ती आहे. काही कमी पडलंच दोन चार हजार कोटी रुपये, तर कर्डीले साहेब बँकेचे अध्यक्ष झालेच आहेत. द्याल ना थोडं कर्ज कर्डीले साहेब. त्यामुळे चिंता करण्यचं कारण नाही”, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

    follow whatsapp