एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली. ४० आमदारांसह भाजपशी हातमिळवणी करत मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगात असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची सेना आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा वेगवेगळा उल्लेख केलाय.
ADVERTISEMENT
शिवसेनेत फूट पडल्यानंतर सध्या एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा राजकीय संघर्ष पावलोपावली बघायला मिळत आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा केला जात असून, थेट केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगातील याचिकांवरील निकाल प्रलंबित असून, शिवसेना कुणाची होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंची सेना आणि एकनाथ शिंदेंच्या सेनेचा देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेला शिल्लक सेना असं म्हटलंय. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेनेचा ओरिजनल शिवसेना असा उल्लेख केला आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय लांबणीवर; घटनापीठासमोरील पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला
देवेंद्र फडणवीस शिवसेनेबद्दल काय म्हणाले?
‘कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करणार का?’, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आमच्यासोबत ओरिजनल शिवसेना आहे. शिंदेंच्या नेतृत्वाखालील ओरिजन शिवसेना आहेत. त्याच्यात जे जे लोक आलेले आहेत. त्यांच्या जागांवर आम्ही कशाला दावा करू. शिल्लक सेना जी आहे. शिल्लक सेनेचा कुणी असेल, तर त्याबद्दल आम्ही आणि एकनाथ शिंदे ठरवू.’
शरद पवारांचा गड बारामतीत भाजप घडवणार परिवर्तन?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…
‘पवारांचा गड उद्ध्वस्त करू आणि २०२४ मध्ये परिवर्तन होईल’, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘आमचं मिशन महाराष्ट्र चाललेलं आहे. आमचं मिशन इंडिया चाललेलं आहे. बारामती महाराष्ट्रातच येत, ते महाराष्ट्राबाहेर येत नाही. त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती आहे.’
आज लोकसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रातलं चित्र कुणासाठी कसं? सी व्होटर्सच्या यशवंत देशमुखांनी दिलं उत्तर
रामोशी समाजासाठी योजना आणणार -देवेंद्र फडणवीस
‘राजे उमाजी नाईक यांना मानवंदना देण्यासाठी येतोय. हा राजकीय दौरा नाही’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘रामोशी समाजाचं योगदान मोठं आहे. पण तो समाज मागे राहुन गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमचं सरकार या समाजासाठी नव्या योजना घेऊन येईल. त्याच दृष्टीने मी संवाद साधण्यासाठी पुरंदरला जातोय.’
ADVERTISEMENT