Devendra Fadnavis यांना धमकी नेमकी कुणी दिली? मुंबई पोलिसांकडे आलेल्या मेसेजमध्ये काय म्हटलंय?

पाकिस्तानी नंबरवरून व्हाट्सअॅपवर वाहतूक पोलिसांना हा धमकीचा संदेश आला आहे, त्यानंतर मुंबई पोलिस कारवाईत आले आहेत. हा मेसेज मिळाल्यानंतर पोलिस आणि तपास यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

01 Mar 2025 (अपडेटेड: 01 Mar 2025, 09:47 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई वाहतूक पोलिसांच्या नंबरवर मेसेज

point

पाकिस्तानमधून आला फडणवीसांना धमकीचा मेसेज

मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर काल आलेल्या एका मेसेजनं खळबळ उडाली. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर, मुंबईच्या वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>New India Cooperative Bank : बड्या उद्योगपतीच्या मुलाला अटक, आरोपीला पळून जायला मदत केली? प्रकरण काय?

पाकिस्तानी नंबरवरून व्हाट्सअॅपवर वाहतूक पोलिसांना हा धमकीचा संदेश आला आहे, त्यानंतर मुंबई पोलिस कारवाईत आले आहेत. हा मेसेज मिळाल्यानंतर पोलिस आणि तपास यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. ज्या व्यक्तीने मेसेज पाठवला आहे त्यानं आपले नाव मलिक शाहबाज हुमायून राजा देव असे सांगितलं आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

हे ही वाचा >>आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला? पोलिसांना नेमका काय संशय? स्वारगेट प्रकरणात नेमकं काय समोर आलं?

दरम्यान, 21 फेब्रुवारी रोजी मुंबईतील गोरेगाव आणि जेजे मार्ग पोलिस ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत धमकीचे ईमेल आले होते. यामध्ये शिंदे यांच्या गाडीत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. गोरेगाव पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 351(3) (गुन्हेगारी धमकी) आणि 353(2) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. नंतर बुलढाणा जिल्ह्यातून दोघांनाही अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली असून, त्यांची नावे मंगेश वायाळ (३५) आणि अभय शिंगणे (२२) अशी आहेत.

    follow whatsapp