राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते असा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे. देशमुख क्वारंटाईन होते तर मग १५ फेब्रुवारीला सुरक्षा रक्षकांच्या लवाजम्यात त्यांनी पत्रकार परिषद कशी काय घेतली? असाही सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. त्यासाठी त्यांनी अनिल देशमुख यांचं १५ फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेचं ट्विटही पोस्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
पाहा काय आहे देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट?
शरद पवार म्हणतात, सरकारला धोका नाही!
देवेंद्र फडणवीस यांनी १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हीडिओच ट्विट केला. देशमुख यांनीच हा व्हीडिओ ट्विट केला होता. १५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन झाले होते असं शरद पवार यांनी सांगितलं. मात्र १५ ला सुरक्षारक्षकांसह समोर , माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद कशी काय घेतली असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. तसंच परमबीर सिंग यांनी केलेला दावा योग्य असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांनी काय म्हटलं होतं?
‘कोरोनाच्या लागण झाल्यामुळे अनिल देशमुख हे नागपूरमधील एका रुग्णालयात 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान दाखल होते. त्यानंतर ते होम क्वारंटाईन होते. त्यामुळे अनिल देशमुख कुठे होते हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही. अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात यावी की नाही याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील हा त्यांचा अधिकार आहे. हे मी काल देखील म्हटलं होतं.’ असं म्हणत पवारांनी परमबीर सिंग यांच्या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचं अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT