Dhananjay Deshmukh : "आरोपींना अभय दिलं नसतं, तर एवढं घडलंच नसतं...", न्यायाची मागणी करत थेट प्रशासनावर नाराजी

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला दोन महिने पूर्ण होऊन देखील घटनेतील मुख्य मास्टर माईंड समोर आलेला नाही. तर कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने काहीशी नाराजी व्यक्त केली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

09 Feb 2025 (अपडेटेड: 09 Feb 2025, 01:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण

point

अजूनही आरोपी कृष्णा आंधळे फरार

point

गुन्हेगारीला बळ कुणी दिलं? धनंजय देशमुख काय म्हणाले?

Santosh Deshmukh Case : सरत्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे राज्य हादरलं. मोर्चे, आंदोलनं, आरोप, खुलासे असा सगळा घटनाक्रम गेले अनेक दिवस सुरू आहे. नाट्यमयरित्या आरोपी हजर झाले, चौकशा लागल्या, अधिकारी बदलले असे अनेक मोठे निर्णय झाले. मात्र, अजूनही एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. यावरुन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. "कृष्णा आंधळे घटना घडण्यापूर्वी दोन महिने फरार होता, त्याला अभय दिले नसते तर हा गुन्हा थांबला असता त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे" असं धनंजय देशमुख म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> MNS Vs Ajit Pawar : "अजित पवारांनी स्वत:च्या जीवावर लढावं आणि मग बोलावं, भाजपचा पदर धरून..."

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला दोन महिने पूर्ण होऊन देखील घटनेतील मुख्य मास्टर माईंड समोर आलेला नाही. तर कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सीआयडी सह एसआयटी तपास यंत्रणा करत आहे. मात्र, संतोष देशमुख कुटुंब अजूनही या दु:खातून सावरू शकलेलं नाही. "माझं दुःख कमी होत नाही. दुःख वाढत चाललंय. न्यायाच्या मागणीच्या भूमिकेत सर्वजण आहोत. मात्र, माझा भाऊ कुठून येणार? त्यासाठी कोणतं दार ठोठवायचं? वेदना भयानक आहेत. कृष्णा आंधळे कागदोपत्री दोन महिने फरार होता. त्याला अभय दिले नसतं तर हा गुन्हा थांबला असता. त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार कोण? हे प्रशासनाने आम्हाला सांगावं" अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली. 

हे ही वाचा >> Manoj Jarange यांच्या मेहूण्यावर तडीपारीची कारवाई, कोण आहे विलास खेडकर? वाळू तस्करी, जाळपोळ....

"आरोपींना अभय देत गेलात, म्हणून पुढच्या घटना घडत गेल्या. तपास एसआयटी आणि सीआयडी चा योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र घटना घडल्यानंतर आरोपींचे मोबाईल चालू होते. कोणतेही मोबाईल स्ट्रेस केले नाहीत. ही गोष्ट सहजासजी घेण्यात आली. गांभीर्याने घेण्यात आली नाही. आरोपी सापडत नाही म्हणून म्हटलं जातय. आरोपीला अभय दिल्यानं मोठी घटना घडली आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे. हे कागदपत्रे देखील सिद्ध करून दाखवणार आहेत" असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.


    follow whatsapp