Dhananjay Deshmukh On Namdev Shastri : महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी या लोकांची मानसिकता तपासायला हवी होती. त्यांच्यावर एव्हढे गंभीर गुन्हे आहेत. ते एव्हढे गुन्हे असताना ते पक्षाच्या ऑफिसमध्ये बसतात. ते एखाद्या नेत्याचे फोटो गाडीला लावून फिरतात. मग त्या लोकांनी ह्यांची मानसिकता तपासायची गरज होती. हे कोणत्या वृत्तीचे लोक आहेत. हे कार्यकर्ते म्हणून घ्यायच्या लायकीचे आहेत का? त्यांच्यावर कोणती गुन्हेगारी आहे? हे काय करतात? याची मानसिकता त्याचवेळी नेत्यांनी तपासायची गरज होती. ह्यांना शिक्षा द्यायला पाहिजे होती. जेणेकरून आरोपींनी केलेली हत्या घडली नसती. त्यांच्यावर किती गंभीर गुन्हे आहेत, ते आम्ही नामदेव शास्त्रींना पुरावे दिले, अशी मोठी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी मुंबई तकशी बोलताना दिलीय.
ADVERTISEMENT
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे, यावर प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख म्हणाले, आता तो कुठे आहे? का शोधत नाहीत? हे सर्व प्रश्न यआधीही उपस्थित केले आहेत. तो आधीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोन वर्षांपासून फरार होता. फक्त कागदोपत्री फरार असताना, त्याची कोणतीही दखल न घेता, विष्णू चाटे जे तालुकाध्यक्ष होते, त्याच्या कार्यालयात हा सर्रास थांबायचा. त्याची गाडी असायची तिथे. त्यांच्या गुन्ह्यांवर त्यावेळीच शिक्षाही दिली असती, तर कदाचित पुढचे गुन्हे घडले नसते किंवा त्याचं प्रमाण कमी झालं असतं.
हे ही वाचा >> Abhishek Sharma: अलिशान घर, महागड्या गाड्या, कोट्यावधी रुपये अन्...! अभिषेक शर्माची संपत्ती वाचून थक्कच व्हाल
"त्यांना कळलं असतं, ज्या लोकांनी त्यांना आधार दिल्यानं चांगल्या गोष्टींना वाव न मिळल्यानं ते पुढचे गुन्हे करू शकले. विष्णू चाटेचा मोबाईल हरवलेला आहे. त्यांनी कुठेतरी टाकून दिलेला आहे. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला काय..नाय काय, त्यांना फाशी होणार आहे. ह्यांनी खून केलेला आहे. पण त्या मोबाईलमध्ये बाकीचे जे पुरावे आहेत. या हत्यासंदर्भातले किंवा इतर गुन्हेगारीतले ते समोर येणं महत्वाचं आहे. कृष्णा आंधळेकडे जे पुरावे आहेत, ते समोर येणं महत्त्वाचं आहे", असंही धनंजय देशमुख म्हणाले.
हे ही वाचा >> 'संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालेल तो नालायक ठरेल', वड्डेटीवारांची जहरी टीका
ADVERTISEMENT
