Dhananjay Deshmukh : जरांगेंचा फोन, पोलिसांचं आश्वासन... धनंजय देशमुख खाली उतरायला तयार

उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात याला कारण समस्त "आकां"चे सरताज देवेंद्र फडणवीस जी हे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Mumbai Tak

मुंबई तक

13 Jan 2025 (अपडेटेड: 13 Jan 2025, 01:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एका टाकीवर धनंजय देशमुख, दुसऱ्या टाकीवर पोलीस

point

वैभवी देशमुखही टाकीवर, ग्रामस्था आक्रमक

point

जरांगेंचा फोन, पोलिसांच्या आश्वासनानंतर देशमुख खाली येणार

धनंजय देशमुख हे बीडमध्ये पाण्याच्या टाकीवर चढले असून, मस्साजोगमध्ये सध्या वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या घटना आणि तपास यंत्रणांवर अविश्वास व्यक्त करत मस्साजोगमध्ये आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी मोबाईल टॉवरखाली मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता, मात्र धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढले, त्यामुळे पोलिसांची धावपळ झाली. या सर्व घडामोडींनंतर आता पोलीस धनंजय देशमुख यांना खाली आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी स्वत: पोलीसही बाजूच्या दुसऱ्या टाकीवर चढले असल्याचं दिसतंय. त्यानंतर आता धनंजय देशमुख अखेर खाली उतरण्यासाठी तयार झाले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : पोलिसांनी मोबाईल टॉवरखाली बंदोबस्त लावला, धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढले

मस्साजोग गावात सध्या जोरदार नाट्यमय घडामोडी सुरू असून, अग्निशमन दलाचे जवानही दाखल झाले आहेत. पोलिसांनी आता ग्रामस्थांना कारवाईचं आश्वासन दिलं असून, मनोज जरांगे यांच्या माध्यमातून धनंजय देशमुख यांना खाली बोलवण्याचा प्रयत्न होत आहे. एकूणच या घटनेनंतर वातावरण चांगलंच तापलं असून, विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांवर आरोप होत आहे.

हे ही वाचा >> Nashik Truck Accident : देवदर्शनाहून परतणाऱ्या पिक-अपला ट्रकची धडक, नाशिकमध्ये 5 जण जागीच ठार, जखमींमध्ये...

सुषमा अंधारे यांनी ट्विट करत या प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्र्‍यांवर निशाणा साधला आहे. उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात याला कारण समस्त "आकां"चे सरताज देवेंद्र फडणवीस जी हे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. सध्या मस्साजोग मध्ये जे चाललंय ते पाहता संतोष देशमुखांची हत्या भाजप  इष्टापत्ती म्हणून बघत आहे का? फडणवीस साहेब हा जीवघेणा खेळ थांबवा... !!

    follow whatsapp