Santosh Deshmukh Case : पोलिसांनी मोबाईल टॉवरखाली बंदोबस्त लावला, धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढले

Dhananjay Deshmukh Protest : मस्साजोग गावच्या ग्रामस्थांनी व धनंजय देशमुख यांनी काही मागण्या करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. धनंजय देशमुख आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार होते. मात्र, पोलिसांनी मोबाईल टॉवर परिसरात तगडा बंदोबस्त लावला होता. त्यानंतर आता मस्साजोगमध्ये नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. 

Mumbai Tak

मुंबई तक

13 Jan 2025 (अपडेटेड: 13 Jan 2025, 12:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख प्रकरणात कारवाईसाठी आंदोलन

point

जलसमाधी आंदोलनावेळी दिलेली आश्वासन अपूर्ण

point

धनंजय देशमुख थेट पाण्याच्या टाकीवर चढले

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटला. राज्यभरात या प्रकरणावरुन वातावरण तापलेलं असतानाही या प्रकरणातले काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. तसंच यंत्रणांकडून होत असलेल्या तपासाबद्दलही देशमुख कुटुंब आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. याच मुद्द्याला धरून आज धनंजय देशमुख आंदोलन करत आहेत. तसंच त्यांच्यासोबत ग्रामस्थ सुद्धा सहभागी झाले आहेत. धनंजय देशमुख आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार होते. मात्र, पोलिसांनी मोबाईल टॉवर परिसरात तगडा बंदोबस्त लावला होता. त्यानंतर आता मस्साजोगमध्ये नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. 

हे वाचलं का?


मस्साजोग गावच्या ग्रामस्थांनी धनंजय देशमुख यांनी काही मागण्या करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. वाल्मिक कराडवर मोका लावण्यात यावा हाच मुद्दा धरून धनंजय देशमुखने आंदोलनाचा इशारा दिलाय. तपास कुठपर्यंत आला? कसा होतोय? तपास का लपवताय? याबद्दल आम्हाला माहिती मिळत नसल्याचं वैभवी देशमुखने म्हटलं आहे. शासकीय वकील म्हणून उज्वल निकम, सतीश माने शिंदे अशीही मागणी सध्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या सर्वा मागण्या घेऊन मस्साजोगमध्ये आज आंदोलन सुरू आहे. त्यातच मोबाईल टॉवरवर बंदोबस्त असल्यानं धनंजय देशमुख हे थेट पाण्याच्या टाकीवर चढल्यानं पोलिसांची धावपळ उडाली. या सर्व घडामोडींदरम्यान, मनोज जरांगे हे सुद्धा मस्साजोगमध्ये दाखल झाले आहेत. 

हे ही वाचा >> Nashik Truck Accident : देवदर्शनाहून परतणाऱ्या पिक-अपला ट्रकची धडक, नाशिकमध्ये 5 जण जागीच ठार, जखमींमध्ये...

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे. बजरंग सोनवणे यांनी फेसबूकवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. बजरंग सोनवणे काय म्हणाले. "खंडणी, स्व. संतोष देशमुखांचे अपहरण, छळ आणि निर्घृण खून या प्रकरणात चालू असलेल्या तपासाबाबत सर्वत्र अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आरोपींच्या समर्थनात सुद्धा कांही लोक आक्रामकपणे पुढे येत आहेत. तपास यंत्रणा तटस्थपणे पुरावे नोंद करतील कि नाही अशी शंका देशमुख कुटुंबियांसह सर्वच नागरिकांना आहे. आरोपी व आरोपींचे कुटुंबिय यांचे गुन्हे समोर येत असताना या गुन्ह्यांवर गांभिर्याने कारवाई होत नसताना दिसत आहे. साखळीतील इतर गुन्हेगारांची चौकशी सुद्धा होत असल्याचे दिसून येत नाही. देशमुख कुटुंबिय भयभीत झालेले असल्याचे बोलून दाखवित आहेत. राज्य सरकारचे जबाबदार पदाधिकारी जिल्ह्यातील जनतेला कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन देण्याचे टाळत आहेत. परिणामी बीड जिल्हा आणि राज्यात  प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. यावर राज्य सरकार, बीड जिल्हा पोलीस, सीआयडी व एसआयटी कडून तातडीने कारवाई होणे अपेक्षित आहे.  या प्रकरणी कायद्यास अपेक्षित असलेला न्याय देशमुख कुटुंबियांना मिळत नसेल तर मला या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून देशमुख कुटुंबिय व मस्साजोग परिसरातील नागरिकांसोबत येणा-या काळात अनोखे आंदोलन करावे लागेल. याची सर्वस्वी जबाबदारी यंत्रणेची असेल."

    follow whatsapp