सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांच्या मेहुण्याने आत्महत्या केली आहे. जेसन वॅटकिन्स असं रेमोच्या मेहुण्याचं नाव आहे. त्याचा मृतदेह मुंबईतल्या राहत्या घरात होता. रेमो डिसूझाचा मेहुणा जेसन वॅटकिन्स याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कूपर रूग्णालयात पाठवण्यात आला असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
या घटनेचा रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लिझेल डिसूझा यांच्यावर गहीरा परिणाम झाला आहे. तू असं कसं काय करू शकतोस? मी तुला कधीच माफ करणार नाही असं म्हणत त्यांनी इंस्टा पोस्टवर आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. रेमो डिसूझाचा मेहुणा आणि त्याच्या पत्नीचा भाऊ जेसन वॉटकिन्सने जगाचा निरोप घेतला आहे. तो त्याच्याच घरी मृतावस्थेत आढळून आला. जेसन वॅटकिन्सच्या निधनाने लिझेल आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
जेसन वॅटकिन्स त्यांच्या मुंबईतील घरामध्ये मृतावस्थेत आढळून आला. वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले की जेसनला कूपर रुग्णालयात आणले आणि ओशिवरा पोलीस आवश्यक कायदेशीर कारवाई करत आहेत. मात्र, रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लिझेल डिसूझा यांनी मृत्यूला दुजोरा दिला आहे.
जेसन वॅटकिन्स हा मुंबईतील मिल्लत नगर येथे राहत होता. त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचेही बोलले जात आहे. जेसन वॅटकिन्स हा रेमो डिसोझा यांच्या पत्नी लिझेल डिसोझा यांचा भाऊ होता. गेल्या काही दिवसांपासून जेसनची प्रकृती बिघडल्याचेही बोलले जात आहे.
लिझेल डिसूझाने तिच्या भावाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इंस्टाग्राम स्टोरीवर पहिला फोटो शेअर करताना लिझेलने, ‘का…? तू माझ्याशी हे कसे करू शकतोस? मी तुला कधीच माफ करणार नाही, असे म्हटले आहे. यासोबतच लिझेलने तिचा आणि तिच्या भावाच्या बालपणीचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिसरा फोटो शेअर करून लिझेलने तिच्या आईची माफी मागितली आहे.
ADVERTISEMENT