आयपीएलच्या २०२१ च्या सामन्यावर सट्टा स्विकारणाऱ्या तीन बुकींना पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवलीच्या लोढा-पलावा भागातून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १७ मोबाईल सह ७ लाख ६५ हजारांची रोकड जप्त केली आहे.
ADVERTISEMENT
लोढा पलावाच्या कॅसारिओ गोल्ड सोसायटीत काही इसम आयपीएलवर बेकायदेशीररित्या सट्टा घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आयपीएलमधील सनराईज हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स संघाच्या क्रिकेट मॅचवर हा सट्टा घेण्यात येत होता. त्याचवेळी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून रितेश कुवरप्रकाश श्रीवास्तव, कुणाल बबनराव दापोडकर आणि निखिल फुलचंद चौरसिया या तिघा बुकीं ऑपरेटरला ताब्यात घेतले.
त्यांच्यावर मुंबई जुगार कायदा तसेच भादविनूसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी याबाबत काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. ही कारवाई कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली.
ADVERTISEMENT