सांस्कृतिक शहर असं ओळख असलेलं डोंबिवली सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरलं आहे. एका अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी मागचे आठ महिने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकरणाला वाचा फुटली ती मुलीने सगळा प्रकार तिच्या घरी सांगितल्याने. तिला मागचे आठ महिने अश्लील व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केलं जात होतं. या प्रकरणात विजय फुके हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यासह आत्तापर्यंत 29 जणांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
या घटनेबाबत तपास अधिकारी एसीपी सोनाली ढोले यांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी आज आणखी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यातले दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना ज्युवेनाईल कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. पीडित मुलीची प्रकृती स्थिर आहे. तिने जो जबाब दिला आहे त्याआधारे पोलिसांचा तपास सुरू आहे. तिच्यावर 33 जणांनी बलात्कार केल्याचं तिचं म्हणणं आहे.
यासंदर्भात तपास सुरू आहे. आत्ता ही माहिती समोर आली आहे की पीडित आणि मुख्य आरोपी यांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. इतर काही आरोपींनाही पीडिता ओळखते. तिच्यासोबत झालेलं दुष्कृत्य डोंबिवली आणि नवी मुंबईच्या काही भागांमध्ये झालं आहे. पीडित मुलगी आणि मुख्य आरोपी यांची ओळख इंस्टाग्रामवरून झाली आहे. आत्तापर्यंत ज्या आरोपींना अटक करण्यात आली त्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही असंही स्पष्ट झालं आहे.
अल्पवयीन मुलीने काय म्हटलं आहे?
29 जणांनी बलात्कार केला. सर्वात आधी डिसेंबरमध्ये या लोकांच्या संपर्कात ही मुलगी आली. पोलिसांनी जे म्हटलं आहे त्यानुसार मुलीची आणि तिच्या प्रियकराची भेट सोशल मीडियावरून झाली. मात्र मुलीने जे सांगितलं आहे त्यानुसार एक व्यक्ती तिच्या घरी येत होती त्या व्यक्तीच्या मार्फत ही मुलगी इतरांच्या संपर्कात आली. यातला जो मुख्य आरोपी आहे विजय फुके त्यालाही अटक करण्यात आली आहे.
त्यानंतर इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिला आधी भेटायला बोलावलं जात असे. त्यानंतर एखाद्या रूमवर नेऊन किंवा कुणाच्या तरी घरी नेऊन तिला शारिरीक संबंधांसाठी भाग पाडलं जात असे. तिने सुरूवातीला या सगळ्याला नकार दिला. मात्र तिचे व्हीडिओ काढण्यात आले ते व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी तिला देण्यात आली होती. त्यानंतर तिच्यावर फेब्रुवारी ते मे या कालावधीत विविध ठिकाणी बलात्कार करण्यात आला.
ADVERTISEMENT