Legislative Council elections: मुंबई: विधान परिषद निवडणुकीमुळे (Vidhan Parishad Election) महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) काही नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राज्यातील शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अर्ज मागे घेण्याचा आज (16 जानेवारी) शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीत 5 मतदारसंघात कोण कोणाला भिडणार हे स्पष्ट झालं आहे. राज्यातील नाशिक, (Nashik) नागपूर, (Nagpur)कोकण, (Konkan) अमरावती (Amravati) आणि औरंगाबादमध्ये (Aurangabad) या पाच मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. (drama unfolded on last day of withdrawal of applications in legislative council elections see who will be candidate)
ADVERTISEMENT
नाशिकमधील ऐनवेळी घडलेल्या घडामोडी आणि इतर मतदारसंघामधील राजकीय गणितं सध्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आहे. सत्यजीत तांबे यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून भरलेला फॉर्म आणि शेवटपर्यंत फॉर्म मागे न घेतलेल्या शुभांगी पाटील यांच्यामुळे नाशिक मतदारसंघातील चुरस बरीच वाढली आहे.
दुसरीकडे नागपूरमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार यांना पक्षाने आदेश देऊनही आपला अर्ज माघारी न घेतल्याने येथील निवडणूक देखील रंजक ठरणार आहे.
विधान परिषद 2023: मी नॉट रिचेबल का होते ते वेळ आल्यावर..: शुभांगी पाटील
अमरावतीत एका जागेसाठी तब्बल 23 उमेदवार रिंगणात आहेत. तर औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे. तर कोकणातही सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी लढत असणार आहे.
पाहा विधान परिषद निवडणुकीतील पाच मतदारसंघात नेमकं कोण कोणाविरुद्ध भिडणार:
नाशिक: नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार आहे. हे स्पष्ट झालं आहे. पाहा नाशकात कोण-कोण उमेदवार आहेत
1. सत्यजीत तांबे – अपक्ष
2. शुभांगी पाटील – अपक्ष (ठाकरे गटाचा पाठिंबा)
3. सुभाष जंगले – अपक्ष
नागपूर: यावेळी नागपूरमध्ये चौरंगी लढत असणार आहे.
1. सुधाकर अडबाले – मविआ
2. नागो गाणार – भाजप पुरस्कृत
3. राजेंद्र झाडे – शिक्षक भारती
4. सतीश इटकेलवार – अपक्ष
अमरावती: अमरावतीत या निवडणुकीत तिरंगी लढत असणार आहे.
1. डॉ. रणजीत पाटील – भाजप
2. धीरज लिंगाडे – महाविकास आघाडी
3. अनिल अमलकार – वंचित बहुजन आघाडी
Satyajeet Tambe यांना BJP पाठिंबा देणार?, महाजनांनी काँग्रेसला डिवचलं
औरंगाबाद: औरंगाबाद शिक्षक मतदार संघात ही दोन उमेदवारांमध्ये थेट लढत असणार आहे.
1. विक्रम काळे – राष्ट्रवादी काँग्रेस
2. किरण पाटील – भाजप
कोकण: कोकण शिक्षक मतदारसंघात देखील देखील दुहेरी लढतच होणार आहे.
1. बाळाराम पाटील – शेकाप
2. ज्ञानेश्वर म्हात्रे – भाजप
अशा प्रमुख लढती या पाच मतदारसंघात होणार आहे. आता या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
ADVERTISEMENT