राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची वाढत जाणारी संख्या पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने जमावबंदीची घोषणा केली. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील विविध पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर शिर्डीतील साईबाबा मंदिरानेही आपल्या दर्शन व्यवस्थेत बदल केले आहेत.
ADVERTISEMENT
अनेक भाविक हे नवीन वर्षाचं स्वागत शिर्डीत जाऊन साईबाबांचा आशिर्वाद घेऊन करतात. परंतू राज्य सरकारने जाहीर केलेल्या जमावबंदीच्या आदेशानंतर रात्री ९ वाजेनंतर मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
Omicron च्या पार्श्वभूमीवर राज्यात Lockdown लागणार? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
मध्यंतरी कोरोनाच्या संक्रमणामुळे राज्यातील सर्व मंदिरं आणि देवस्थानं बंद करण्यात आली होती. ही मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आल्यानंतर काही महिने उलटतात तोच ओमिक्रॉनचं संकट वाढल्यामुळे पुन्हा एकदा हा निर्णय घेण्यात आल्याचं बानायत यांनी सांगितलं. रात्री साडेदहा वाजता होणारी शेजआरती आणि पहाटे साडेचार वाजता होणारी काकडआरती नियमीत वेळेत होणार असून या आरतीला भाविकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचं बानायत यांनी स्पष्ट केलं.
लस घेतलेल्यांचंही ‘ओमिक्रॉन’ने वाढवलं टेन्शन! केंद्राच्या माहितीनंतर तज्ज्ञांचा इशारा
याचसोबत जमावबंदीच्या आदेशामुळे शिर्डी संस्थानाचं श्री. साईप्रसादालय, लाडू विक्री केंद्र, कँटीन या सर्व सुविधा रात्री ९ वाजेनंतर बंद राहणार आहेत. सर्व भाविकांनी सरकारी नियमांचं पालन करुन संस्थानाला मदत करावी असं आवाहन बानायत यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT