कोण आहे ‘अंगूरी भाभी’चा Ex पती? अभिनेत्रीसाठी सोडलेली नोकरी…

मुंबई तक

• 04:02 AM • 10 Mar 2023

‘भाबीजी घर पर है’ या मालिकेतील ‘अंगूरी भाभी’ची प्रसिद्ध भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे सध्या तिच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री शुभांगी अत्रे लग्नाच्या 19 वर्षांनंतर पती पियूष पुरीकडून घटस्फोट घेऊन वेगळी झाली आहे. एका मुलाखतीत शुभांगीने स्वत: सांगितलं की, ती गेल्या एक वर्षांपासून वेगळी राहत आहे. ‘तिने हे नातं जपण्याचा प्रयत्न केला, पण काहीही […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

‘भाबीजी घर पर है’ या मालिकेतील ‘अंगूरी भाभी’ची प्रसिद्ध भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे सध्या तिच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री शुभांगी अत्रे लग्नाच्या 19 वर्षांनंतर पती पियूष पुरीकडून घटस्फोट घेऊन वेगळी झाली आहे.

एका मुलाखतीत शुभांगीने स्वत: सांगितलं की, ती गेल्या एक वर्षांपासून वेगळी राहत आहे.

‘तिने हे नातं जपण्याचा प्रयत्न केला, पण काहीही निष्पन्न झालं नाही. काही नुकसानीची भरपाई होत नाही.’ असं पुढे शुभांगीने सांगितलं.

शुभांगी अत्रेला एक 18 वर्षांची मुलगी आहे. तिचा सांभाळ दोघं मिळून करतात.

शुभांगीने पियूषसोबत लग्न केल्यानंतर, अॅक्टिंग करिअरला सुरूवात केली होती.

शुभांगीने वयाच्या 21व्या वर्षी मुलीला जन्म दिला. पतीने करिअर करण्यासाठी तिला पूर्ण पाठिंबा दिला.

मुलीचा सांभाळ करण्यासाठी आणि शुभांगीलाही काम करता येईल म्हणून पियूषने नोकरी सोडली होती.

पण अद्यापही दोघंही पती-पत्नी काही कार्यक्रमानिमित्त एकत्र येतात आणि फोटोही सोशल मीडियावर शेअर करतात.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp