ADVERTISEMENT
नागपूर शहर हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे.
केंद्र सरकारने 2016 मध्ये दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा हक्क कायदा आणला.
या अंतर्गत पुढाकार घेत केंद्र सरकारने दक्षिण भारत आणि मध्य प्रदेशात काही दिव्यांग उद्यानांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय.
आता नागपूरच्या पारडी परिसरात दिव्यांग मुले आणि नागरिकांसाठी एक ‘अनुभूती इन्क्लुझिव्ह उद्यान’ उभारले जात आहे.
90 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या उद्यानासाठी 12 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उद्यानात सर्व 21 प्रकारच्या अपंगांसाठी अनुकूल सुविधा असतील. हे जगातील पहिलं अपंगांसाठीचं उद्यान आहे.
यामध्ये टच अँड स्मेल उद्यान, हायड्रोथेरपी युनिट, वॉटर थेरपी, विकलांग मुलांसाठी स्वतंत्र खोली अशा सुविधा असतील.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नांमुळे ते साकार होत आहे. त्यांच्या उपस्थितीत याचं भूमीपूजन पार पडलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून हे उद्यान विकसित केले जात आहे.
या उद्यानाला अनुभूती दिव्यांग उद्यान असे नाव देण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT