ठाकरेंचं पत्र कोश्यारींच्या जिव्हारी! सांगितलं 12 आमदारांच्या फाईलचं सत्य

मुंबई तक

20 Feb 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:34 PM)

Bhagat singh koshyari clarifies on 12th mlc appointment: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने (Maha vikas Aghadi) विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त 12 जागांसाठी नावं पाठवली होती, पण राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त होईलपर्यंत भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshayri) यांनी त्याला मंजुरी दिलीच नाही. कोर्टातही हे प्रकरण गेलं, पण त्यानंतरही भगतसिंह कोश्यारी यांनी फाईलवर […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

Bhagat singh koshyari clarifies on 12th mlc appointment: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने (Maha vikas Aghadi) विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त 12 जागांसाठी नावं पाठवली होती, पण राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त होईलपर्यंत भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshayri) यांनी त्याला मंजुरी दिलीच नाही. कोर्टातही हे प्रकरण गेलं, पण त्यानंतरही भगतसिंह कोश्यारी यांनी फाईलवर स्वाक्षरी केली नाही. याचं नेमकं कारण अद्यापपर्यंत समोर आलेलं नव्हतं. अखेर भगतसिंह कोश्यारी यांनी याविषयावरील मौन सोडलं. मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत भगतसिंह कोश्यारी यांनी याचा ठपका उद्धव ठाकरेंवर ठेवला. 12 आमदारांच्या नियुक्तीबद्दल लिहिलेल्या पत्रात कोश्यारींना नेमकं काय खटकलं, तेही समोर आलंय.

हे वाचलं का?

प्रश्न – जोपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, तोपर्यंत तुमची भूमिका वेगळीच होती. म्हणजे विधान परिषदेतील 12 सदस्यांची नियुक्ती करणं. तुम्ही त्या फाईलवर शेवटपर्यंत स्वाक्षरी केली नाही. स्वाक्षरी न करण्याचं कारणही तुम्ही सांगितलं नाही.

भगतसिंह कोश्यारी -बघा. त्यांची (महाविकास आघाडी) शिष्टमंडळ येत राहिली. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही आधी हे पत्र बघा. पाच पानांचं पत्र आहे. ते प्रकरण नंतर सुप्रीम कोर्टात गेलं. पाच पानांच्या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात. कायदे सांगत आहात. आणि शेवटी लिहिता की, 15 दिवसांत मंजूर करा. कुठे लिहिलंय की, मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतो की मला इतक्या दिवसांच्या आत मंजूर करून पाठवा. संविधानात कुठे लिहिलं आहे? ते जेव्हा समोर येईल, तेव्हा तुम्हाला कळेल की सत्य काय आहे. तसं पत्र पाठवलं नसतं, तर मी पुढच्याच दिवशी त्यावर सही करणार होतो. तुम्ही असली पत्र लिहिता.

पहाटेच्या शपथविधीबद्दल कोश्यारींचा गौप्यस्फोट; अजित पवारांचं नाव घेत म्हणाले,…

प्रश्न – तुमचे संबंध चांगले असते, तर अशा प्रकारचं पत्र पाठवलं गेलं नसतं.

भगतसिंह कोश्यारी – माझे संबंध खूप चांगले होते, पण त्यांचे (उद्धव ठाकरे) सल्लागार कोण होते? त्यांचे हेच सगळे आमदार येऊन मला सांगत होते की, साहेब तुम्ही आम्हाला वाचवा. उद्धव ठाकरे तर शकुनी मामाच्या जाळ्यात अडकले. माहिती नाही, त्यांचा कोण शकुनी मामा होता.

प्रश्न – तुमचं असं म्हणणं आहे का की एकनाथ शिंदेंच्या बाजूचे आमदार तुमच्याकडे येऊन सांगत होते की, उद्धव ठाकरे चुकीचं करत आहेत.

भगतसिंह कोश्यारी – मला नाही माहिती ते एकनाथ शिंदेंसोबत होते की नाही. मला स्वतःच लोक बोलत होते. उद्धव ठाकरे तर संत माणूस आहेत. ते राजकारणात अडकले गेले. तुम्हाला माहितीये का उद्धव ठाकरे कसे फसले. पाच पानाचं पत्र लिहितात, त्यामुळे मी म्हणतोय. 15 दिवसांत मंजूर करा म्हणतात. माणूस जर सरळमार्गी, सज्जन नसता, राजकारणी असता, शरद पवारांसारख्या ट्रिक माहिती असत्या, तर असं लिहिलं असतं का? चार ओळीत लिहून पाठवलं असतं, तर सही करणं मला भाग पडलं असतं.

Shiv Sena: ठाकरे सुप्रीम कोर्टात, EC वर गंभीर आरोप, याचिकेत काय?

प्रश्न – शरद पवारांनी पंतप्रधानांकडे तक्रार केलेली की, राज्यपाल म्हणून तुमची वागणूक चांगली नाही.

भगतसिंह कोश्यारी -बघा. शरद पवार विरोधात आहेत, ते माहिती काय तक्रार करतील. त्यांनी हायकोर्टाचं जे जजमेंट आहे लवासाबद्दल, ते बघावं.

    follow whatsapp