ADVERTISEMENT
मॉडेल पिहू यादवने तिच्या एका व्हिडीओमध्ये पतीला खुश कसं ठेवायचं याबाबत 3 टिप्स दिल्या आहेत.
पिहू यादवचा हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला होता. आतापर्यंत त्याला 1 कोटी 70 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हिडीओमध्ये पिहू यादव म्हणते, ‘पतीला खुश ठेवण्याचा पहिला मार्ग म्हणजे पतीचं ऐकावं.’
‘दुसरा मार्ग, पतीला मित्रांसोबत हँग आउट करू द्या आणि तिसरा पतीला बोलण्याची पूर्ण संधी द्या.’
मात्र, ज्यावेळी पिहूचा पती व्हिडीओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती त्याला गप्प करते.
पिहूचा हा व्हिडिओ 3 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. तसेच हजारो इंस्टाग्राम युजर्सनी यावर कमेंट केल्या आहेत.
पिहूचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत. तिच्या रील्सला लाखो व्ह्यूज मिळतात. चाहत्यांना तिची देसी स्टाइलही आवडते.
पिहूचा पती प्रदीप यादव दिल्ली पोलीस दलात आहे. प्रदीप अनेक व्हिडीओंमध्ये पिहूसोबत डान्स करताना दिसतो.
पिहूने एका दिवसात ही प्रसिद्धी मिळवलेली नाही. यासाठी तिने खूप कठीण प्रसंग पाहिले.
नजबगढ या छोट्याशा गावात लहान वयातच तिचा विवाह झाला. लग्नानंतर दोन वर्षांनी नवऱ्याला कॅन्सर झाला.
उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने ती सोशल मीडियाकडे वळली, ज्यामुळे ती आज इथपर्यंत पोहोचली.
ADVERTISEMENT