महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे -संजय राऊत

मुंबई तक

• 12:52 PM • 31 Jul 2022

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं. संजय राऊता यांना त्यांच्या घरून ताब्यात घेतल्यानंतर ईडी कार्यालयात नेण्यात आलं. ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी संजय राऊतांनी शिंदे गटावर प्रहार केला. पेढे वाटा पेढे, असं सांगत संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना सुनावलं. रविवारी सकाळी ७ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडुप […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं. संजय राऊता यांना त्यांच्या घरून ताब्यात घेतल्यानंतर ईडी कार्यालयात नेण्यात आलं. ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी संजय राऊतांनी शिंदे गटावर प्रहार केला. पेढे वाटा पेढे, असं सांगत संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना सुनावलं.

हे वाचलं का?

रविवारी सकाळी ७ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी दाखल झाले. संजय राऊत यांची चौकशी ईडीकडून सुरू असतानाच शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी अटक होणार असं विधान केलं.

संजय शिरसाट संजय राऊतांवरील कारवाईबद्दल काय बोलले?

‘जैसी करणी वैसी भरणी. या कारवाईतून कुणाची सुटका नाही. ‘एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई पाहता संजय राऊत यांना अटक होऊ शकते. संजय राऊत यांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली. संजय राऊत हे शिवसेनेत असले काय आणि नसले काय त्यामुळे आता शिवसेनेत काही फरक पडत नाही,’ असं शिरसाट म्हणाले होते.

Patra chawl land scam case : खासदार संजय राऊत यांना ईडीने घेतलं ताब्यात

ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात नेण्यात आलं. ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय शिरसाट यांच्या विधानाबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आली.

संजय राऊत म्हणाले, ‘ज्याप्रकारे खोटी कागदपत्रे, खोट्या साक्ष, हे सगळं महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी केलं जात आहे. शिवसेनेला कमजोर करण्यासाठी केलं जात आहे, पण शिवसेना कुमकुवत होणार नाही. महाराष्ट्र कमजोर होणार नाही.”

“दुसरी गोष्ट म्हणजे संजय राऊत झुकणार नाही आणि पक्षही सोडणार नाही. संजय राऊत शिवसेना सोडणार नाही”, असं राऊत म्हणाले. शिरसाटांच्या विधानावर राऊत म्हणाले, “पेढे वाटा पेढे. महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे. अरे बेशरम लोक आहात तुम्ही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला”, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

संजय राऊतांना अटक होण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील शिवसैनिकांना काय सांगितलं?

संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत काय म्हणाले?

“बाळासाहेब झुकले नाहीत. संजय राऊत झुकणार नाही. ते उद्धव ठाकरेंना सोडणार नाहीत. जेव्हा संजय राऊतांना नेलं, तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. माझी आई कट्टर शिवसैनिक आहे. ED चं जे समन्स आलं होतं ते पत्राचाळचं होतं. जे डॉक्युमेंट्स होते ते इन्कम टॅक्सचे आहेत. आमच्या पण डोळ्यात अश्रू आहेत, पण संजय राऊत झुकणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आम्ही कुणीही शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंना सोडणार नाही”, अशा भावना सुनील राऊत यांनी व्यक्त केल्या.

    follow whatsapp