Torres Scam Update : टोरेस घोटाळ्याच्या प्रकरणात ED ची एन्ट्री... मनी लॉन्ड्रींग प्रकरणाची चौकशी सुरू

भाजी विक्रेत्याने (31) यांनी टोरेस कंपनीत 1.25 लाख रुपयांचे पैसे गुंतवल्याचा दावा केला आहे. एफआयआरमध्ये 66 गुंतवणूकदारांच्या 13.85 कोटी रुपयांच्या रकमेचा उल्लेख करण्यात आला होता. याप्रकरणाची आता ED चौकशी करणार आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

14 Jan 2025 (अपडेटेड: 14 Jan 2025, 10:51 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

टोरेस प्रकरणात ईडीची एन्ट्री...

point

मनी लॉन्ड्रींग प्रकरणाची ईडीकडून होणार चौकशी

Torres Scam Update : टोरेस पोंझी स्कॅम प्रकरणात कथित मनी लाँड्रिंगची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय, मुंबईने अंमलबजावणी प्रकरण चौकशी अहवाल (ECIR) नोंदवला आहे. इंडियन एक्सप्रेसने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ईडीचा हा खटला मुंबईच्या दादर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : "...तर इतिहास माफ करणार नाही, देशमुख कुटुंबावर आंदोलनाची वेळ येणं दुर्दैवी"

भाजी विक्रेत्याने (31) यांनी टोरेस कंपनीत 1.25 लाख रुपयांचे पैसे गुंतवल्याचा दावा केला आहे. एफआयआरमध्ये 66 गुंतवणूकदारांच्या 13.85 कोटी रुपयांच्या रकमेचा उल्लेख करण्यात आला होता. नंतर, हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलं. आर्थिक गुन्हे शाखेकडे रविवारपर्यंत सुमारे 2000 गुंतवणूकदारांनी पुढे येऊन त्यांच्या 37 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची माहिती दिली होती. फेब्रुवारी 2023 मध्ये स्थापन झाल्यापासून प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या परकीय रेमिटन्ससह सर्व पैशांच्या व्यवहारांची ईडी अधिकारी चौकशी करू शकतात.

मास्टरमाईंड कोण? 

मुंबई पोलिसांनाही टोरेस ज्वेलर्स गुंतवणूक घोटाळ्यात मोठं यश आलं असून, पोलिसांनी या घोटाळ्याचे सूत्रधार म्हणून दोन युक्रेनियन नागरिकांची ओळख पटवली आहे. त्यापैकी एक महिला असल्याचंही समोर आलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, आर्टेम आणि ओलेना स्टोइन हे दोन संचालक सर्वेश सुर्वे आणि तौसिफ यांच्याशी संगनमत करून ही फसवणूक करत होते. ओलेना आणि आर्टेमविरुद्ध लवकरच लूक आउट सर्क्युलर (LOC) जारी केलं जाणार आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर ओलेना आणि आर्टेम हे भारत सोडून पळून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा >> Badlapur Thane Crime News : पत्नीवर अतिप्रसंग करणाऱ्या मित्राला पतीने डोक्यात हातोडी घालून संपवलं, नंतर...

नरिमन पॉइंट इथे राहणाऱ्या भाजी विक्रेत्या प्रदीप कुमार ममराज यांनी या कंपनीकडून फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात केली. कंपनीविरुद्ध पोलिसांना हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कंपनीने मोइसनाइट स्टोनच्या ( बनावट हिरे) गुंतवणुकीवर भरगोस परतावा देण्याचं आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना आमिष दाखवल्याचा आरोप आहे. कंपनीने 6 टक्के साप्ताहिक परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं. कंपनीने सुरुवातीला परतावा देऊन गुंतवणूकदारांना विश्वास संपादन केला. पण 30 डिसेंबर 2024 नंतर परतावा देणं बंद केलं.

    follow whatsapp