ईडीचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांवरुन शिवसेना खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार आहेत. आज मोठा बॉम्ब फोडणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. या सगळ्या गरमागरमीत आता ईडीने मुंबईत आणि मुंबई लगतच्या परिसरात छापेमारी सुरू केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याचं कळतं आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छापे मुंबईच्या सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आले आहेत. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीचे छापे नुकतेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने दाऊद इब्राहिम विरुद्ध नोंदवलेल्या केसच्या संदर्भात आहेत आणि त्या आधारावर ईडीने ECIR देखील नोंदवला आणि तपास सुरू केला. दाऊद भारतभर दहशतवादी कारवाया करत असल्याचे कळल्यानंतर NIA ने दाऊदविरोधात UAPA अंतर्गत गुन्हा नोंदवला. एनआयए अधिकार्यांनी असेही नमूद केले की दाऊदने हवाला चॅनेलद्वारे भारतभर अशांतता निर्माण करण्यासाठी त्याच्यासाठी काम करणाऱ्यांना पैसा पुरवला.
मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासानंतर दाऊद इब्राहिम आणि त्याची दिवंगत बहीण हसिना पारकर यांच्याशी संबंधित लोकांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. काही काळापूर्वी, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मालमत्तेसाठी मुंबई 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी आणि दिवंगत हसीना पारकरच्या साथीदाराशी मालमत्ता करार करणाऱ्या महाराष्ट्राच्या मंत्र्याचे नाव दिले होते. या डीलची एजन्सीकडूनही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
धारावीचा रहिवासी… ‘दाऊद गँग’ कनेेक्शन… ‘मुंबई’तून निघाला होता दिल्लीला; ATS ची माहिती
९० च्या दशकामध्ये भारत सोडून पळ काढणाऱ्या दाऊद इब्राहिम परदेशात बसून देशामध्ये मोठे आर्थिक व्यवहार करतो असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. मुंबईमधील डी कंपनीचा संबंध पंजाबपर्यंत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. या पंजाब कनेक्शनमुळे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून अंडरवर्ल्डचा वापर पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
मुंबई पोलीस खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा असणारा दाऊदने डोंगरीमधून आपल्या गुन्हेगारी क्षेत्रातील कारवाया सुरू केल्या होत्या. त्यानंतर त्याने हाजी मस्तानच्या गँगशी हातमिळवणी केली. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील ब्लॅक चॅप्टर म्हणून याकडे पाहिलं जातं. कालावधी सुरु झाला. १९८० दरम्यान दाऊदला एका चोरीच्या प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर त्याच्यावरील गुन्ह्यांची संख्या वाढतच गेली. हाजी मस्तान आणि पठाण गँगदरम्यानच्या वादामुळे दिवसोंदिवस दाऊद अधिक धोकादायक झाला. पठाण गँगमध्ये प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून आलेल्या लोकांचा समावेश होता. मस्तान आणि दाऊद यांच्या गँग वेगळ्या झाल्या. त्यानंतर गँगवॉरही रंगलं होतं. तशीच दुश्मनी ही नंतर छोटा राजन आणि दाऊद यांच्यातही पाहण्यास मिळाली.
ADVERTISEMENT