काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली होती. ईडीच्या या कारवाईनंतर संपूर्ण राज्यात राजकीय खळबळ माजली होती. दरम्यान अनिल देशमुखांसह नागपूरातील इतर मंत्री व अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार करणाऱ्या वकीलालाही ईडीने समन्स बजावलं आहे.
ADVERTISEMENT
नागपूरचे वकील तरुण परमार यांनी यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, नागपूरमधील एक मंत्री, त्यांचे सचिव व अन्य मोठ्या अधिकाऱ्यांचा Money Laundering मध्ये सहभाग असल्याची तक्रार केली होती. यानंतर ईडीने परमार यांनी तुमच्याजवळील कागदपत्र आणि माहिती घेऊन ११ वाजता कार्यालयात या असं समन्स बजावलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED चा दणका बसला आहे. कारण त्यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि PA कुंदन शिंदे या दोघांना अटक करण्यात आली आहे. ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतल्या घरांवर ईडीने छापेमारी केली होती. त्यांची चौकशी सुमारे सहा ते सात तास चालली. या चौकशीतून बाहेर आल्यानंतर त्यांनी परमबीर सिंग यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आहेत असं म्हटलं होतं. तसंच संजीव पालांडे यांना ईडीने काल ताब्यात घेतलं होतं त्याबाबत विचारलं असता त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
शुक्रवारीच संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यांना रात्री उशिरा ईडी कार्यालयात आणण्यात आलं आणि त्यानंतर रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास या दोघांनाही अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT