Arpita Mukherjee: EDचा मोठा खुलासा, अर्पिता मुखर्जी चालवते 12 बनावट कंपन्या

मुंबई तक

• 04:13 PM • 25 Jul 2022

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात (Teacher recruitment scam) अटक करण्यात आलेल्या पार्थ चॅटर्जींची (Partha Chatterjee) जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिच्याबाबत ईडीने (ED) आणखी एक मोठा खुलासा केला आहे. अर्पितावर 12 बनावट कंपन्या चालवल्याचा आरोप आहे. या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पैशांची हेराफेरी करण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे आहे. अर्पिताला शनिवारी ईडीने अटक केली होती. तिच्या घरातून 21 […]

Mumbaitak
follow google news

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात (Teacher recruitment scam) अटक करण्यात आलेल्या पार्थ चॅटर्जींची (Partha Chatterjee) जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिच्याबाबत ईडीने (ED) आणखी एक मोठा खुलासा केला आहे. अर्पितावर 12 बनावट कंपन्या चालवल्याचा आरोप आहे. या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पैशांची हेराफेरी करण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे आहे. अर्पिताला शनिवारी ईडीने अटक केली होती. तिच्या घरातून 21 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

जोका येथील अर्पिताच्या फ्लॅटच्या झडतीदरम्यान ईडीला अनेक कागदपत्रे सापडली आहेत. या कागदपत्रांवरून बनावट कंपन्या चालवल्याचा खुलासा झाला आहे. ओडिशा आणि तामिळनाडूमधील वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणारे नामवंत लोकही यात सामील असल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे.

अर्पिता मुखर्जी 12 बनावट कंपन्या चालवते- ED

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिक्षक भरती घोटाळ्याच्या प्राथमिक तपासात पार्थ चॅटर्जीची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी 12 बनावट कंपन्या चालवत असल्याचे समोर आले आहे. जोका येथील अर्पिता मुखर्जीच्या घरावर शनिवारी 23 जुलै रोजी सायंकाळी छापा टाकून या कंपन्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. ओडिशा आणि तामिळनाडूमधील वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणारे नामवंत लोकही यात सामील असल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे.

लवकरच आणखी काही लोकांची चौकशी होणार

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला घरातून मिळालेल्या कागदपत्रांवरून ती या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पैशांची हेराफेरी करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आमच्याकडे अशा 12 कंपन्यांची कागदपत्रे आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला ओडिशा आणि तामिळनाडूमधील काही लोकांचाही यात समावेश असल्याचे सापडले आहे. या लोकांच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण झाली आहे. आम्ही या लोकांवर लक्ष ठेवून आहोत. या लोकांची देखील लवकरच चौकशी होईल असे ईडीने सांगितले आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ओडिशा आणि तामिळनाडूमधील वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसमधील लोकांची मिलीभगत लक्षात घेऊन आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की अर्पिता मुखर्जीने कोणत्या फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये गुंतवणूक केली आहे का? आमच्याकडे अनेक दस्तऐवज, फाइल्स आणि स्वाक्षरी केलेले कागदपत्रे आहेत.

अर्पिता मुखर्जी कोण आहे?

अर्पिता मुखर्जी एक अभिनेत्री आहे. तिने बंगाली, तमिळ, ओरिया चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती पार्थ चॅटर्जींची जवळची सहकारी आहे. पार्थ चटर्जी चालवत असलेल्या दुर्गा पंडालचे काम ती पाहते. शनिवारी चौकशीदरम्यान ईडीने अर्पिताच्या घरातून 21 कोटी रुपये जप्त केले होते, त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

    follow whatsapp