ADVERTISEMENT
कशी घडली घटना?
नेत्याचा मुलगा रात्री उशिरा जेवण्यासाठी दौलताबाद रोडवरील ढाब्यावर पोहोचला होता. पण रात्रीचे 12 वाजले असल्याने ढाबा बंद होता. तरुण शिवसेना पदाधिकाऱ्यानं ढाब्यावर असलेल्या मॅनेजरला जेवण द्यायला सांगितलं. पण मॅनेजरने ढाबा बंद असल्याचं सांगितलं. त्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यानं बाहेरून ढाब्यावर काम करणाऱ्या लोकांना शिवीगाळ केली आणि काही लोकांना तिथे बोलवून घेतलं. ढाब्यावर काम करणाऱ्या लोकांनी त्यानंतर तिथे पोलिसांना बोलवून घेतलं. पोलीस उपनिरीक्षक आणि दोन हवालदार तिथे काही वेळातच दाखल झाले. यावेळी, पोलीस उपनिरीक्षक आणि हवालदार ढाब्याबाहेर उभ्या असलेल्या तरुणांना समज देण्याचा प्रयत्न केला, पण तरुणांनी ढाब्यात घुसण्याचा करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी या तरूणांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तरूण पोलिसांना ढकलून ढाब्यात घुसले आणि कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की केली.
हे ही वाचा >> Tanaji Sawant Son : सावंतांचा लेक कुठून उडाला कुठे लँड झाला? नाट्यमय घटनेचा घटनाक्रम 10 मुद्द्यांमध्ये
यादरम्यान, पोलीस तरुणांना भांडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असताना काही तरुणांनी थेट पोलिसांनाच धक्काबुक्की केली. ही संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.या हाणामारीत काही पोलीस जखमी झाले असून, त्यानंतर पोलिस कर्मचारी आणि ढाबा मालकाच्या तक्रारीवरून कॅन्टोन्मेंट सिटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे. आठ तरुण आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
