Eknath shinde On CM Uddhav Thackeray Khed Speech : उद्धव ठाकरेंनी खेडच्या सभेत एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या देशद्रोही विधानावरून शिंदेंना लक्ष्य केलं. ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “खरं म्हणजे आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर जनतेच्या आणि ईश्वराच्या आशीर्वादाने हे सगळं घडलं. त्यामुळे जनतेचे आशीर्वाद आणि देवदेवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज आशीर्वाद यात्रा होती. त्याला लोकांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खऱ्या अर्थाने आम्ही गेल्या सहा-सात महिन्यात मुंबईचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे आणि कामंही सुरू झाली आहे. त्याची पोचपावती लोकांनी प्रतिसाद देऊन व्यक्त केली आहे. ही शिवसेना भाजप युती सरकारच्या कामाची पोचपावती आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरुवातीला आशीर्वाद यात्रेबद्दल म्हणाले.
ठाकरेंच्या सभेला शिंदेंनी काय दिलं उत्तर?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “खरंतर तोच शो होता. तीच कॅसेट होती. तोच थयथयाट होता, फक्त जागा बदलली होती. बाकी काही नवीन मुद्दे नव्हते. आरोप प्रत्यारोप करण्याची ही चढाओढ तिथे पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने एवढंच सांगेन की, बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना ही कुणाचीही खासगी प्रॉपर्टी नाही.”
“आम्ही त्यांच्या संपत्तीवर दावा केलेला नाही, पण त्यांचे विचार आम्ही पुढे नेतोय. त्यामुळे ही त्यांची खासगी प्रॉपर्टी नाही. बाळासाहेबांचं एक कर्तृत्व होतं. वडील-वडील करून त्यांना कुणी छोटं करू नये. एवढंच माझं सांगणं आहे. त्यामुळे आज पाहतोय आपण की खरे शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आमच्यासोबत, शिवसेनेसोबत आहेत”, असा दावा शिंदेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर देताना केला.
Shiv Sena UBT: “मोदींची मुक्ताफळे देशाची बदनामी नव्हती तर काय?”
मुस्लिम संघटनांना अपील… ठाकरेंच्या सभेला मुंबई, पालघर रायगडमधून लोक आणले… शिंदे काय म्हणाले?
“त्यांना माहिती होतं की, खेडमध्ये लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही. म्हणून मागची जी विधान परिषदेची निवडणूक झाली, त्यामध्ये कोकणातल्या लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली आणि आमचा उमेदवार निवडून दिला. त्यामुळे त्यांना धास्ती होती की, लोकं कशी गोळा होतील. म्हणून त्यांनी मुंबई, रायगड, पालघर, ठाणे येथून गाड्या भरून लोक बोलावली. ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीला अपील करावं लागलं. मुस्लिम संघटनांना त्यांना अपील करावं लागलं”, असा दावा शिंदेंनी ठाकरेंवर टीका करताना केला.
संजय कदमांच्या प्रवेशावरून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
संजय कदम यांच्या शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेशावरून एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावाला. “राष्ट्रवादी तर आता… पूर्वी काही लोक मातोश्रीची भाकरी खाऊन राष्ट्रवादीची चाकरी करताना आपण पाहिलेलं आहे. आता राष्ट्रवादीचे लोक त्यात घुसवायची सुरुवात झालेली आहे. इतर पक्षातील लोक येत नाहीत. त्यामुळे ही काय मॅच फिक्सिंग आहे. राष्ट्रवादीतील लोक उद्धव ठाकरे गटात घेण्याची जी काय सुरूवात झालेली आहे. हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पाहतोय. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे”, अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला.
Shiv Sena UBT: “मोदींची मुक्ताफळे देशाची बदनामी नव्हती तर काय?”
यावेळी शिंदे असंही म्हणाले की, “त्यांनी आरोप करत राहावेत आम्ही काम करत राहू. जनतेला काम हवं आहे. जनतेला या शिव्या, शाप, आरोपांमध्ये स्वारस्य नाही. कामामध्ये स्वारस्य आहे. रामदास कदम यांनी रॅलीचं आयोजन केलं आहे. सभा होणार आहे.”
उद्धव ठाकरेंच्या त्या विधानावर एकनाथ शिंदेंना हसू अनावर म्हणाले, ‘हास्यास्पद आहे’
‘आम्हाला देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडू’, असं उद्धव ठाकरे खेडच्या सभेत म्हणाले होते. याबद्दल एकनाथ शिंदेंना विचारण्यात आलं. त्यावर शिंदेंना हसू अनावर झालं. हसतच शिंदे म्हणाले, “हे हास्यास्पद आहे. खरं म्हणजे रोज उठसूठ शिव्याशाप देणं, आरोप करणं, केंद्रीय नेतृत्व… देशाचे पंतप्रधान मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खालच्या पातळीवर बोलणं, घाणेरडी टीका करणं, अशा प्रकारचं रोज सुरू आहे. पण, भविष्यात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणायला ही लोक मागे पडणार नाही. ते होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे”, असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला.
‘देशद्रोही म्हणाल, तर जीभ हासडून टाकू’ : ठाकरेंकडून CM शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार 2019 मध्येच गमावला -एकनाथ शिंदे
“स्वातंत्र्यसैनिकांबद्दल ते बोलले आहेत. सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं, त्यांच्यासोबत सभा घेणं, त्यांच्यासोबत आघाडी करणं, जे बाळासाहेबांनी कधीच केलं नाही. म्हणूनच बाळासाहेबांचे विचार आणि नाव घेण्याचा नैतिक अधिकार तुम्ही 2019 मध्येच गमावला आहे. ज्यावेळी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. त्याचवेळी तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार गमावला. योग्य वेळी, योग्य उत्तर तुम्हाला जनता देईल,” अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.
ADVERTISEMENT