आई कुठे काय करते मालिका सध्या लोकप्रिय आहे. या मालिकेत अप्पांची भूमिका साकारणारे अभिनेते किशोर महाबोले यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं. मात्र परिस्थिती इतकी गंभीर असताना देखील किशोर महाबोले यांनी शूटींग सुरु करण्यावर भर दिला.
ADVERTISEMENT
दोन आठवड्यांपूर्वी अभिनेते किशोर महाबोले यांच्या वडिलांचं निधन झालं. मुख्य म्हणजे शूटींग सुरु असताना सेटवर त्यांना ही बातमी कळली. मात्र तरीही वडिलांच्या जाण्याचं दुःख बाजूला सारत चेहऱ्यावर आनंदी भाव आणत त्यांनी मालिकेतील एक मिश्किल सीन शूट केला. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे हा किस्सा सांगितला आहे.
मिलिंद गवळी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, “माझी आणि त्यांची ओळख आई कुठे काय करतेच्या सेटवरच झाली, पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या मिश्किल स्वभावाने मन जिंकून घेतलं. छोटंसं सुखी कुटुंब, कौटुंबिक माणसाने कसे राहावे हे आप्पांकडून शिकण्यासारखं आहे. या करोनाच्या कठीण काळामध्ये आम्ही एकत्रच आम्ही या सिरीयल शूटिंग करतो आहोत. लॉकडाऊनमध्येही शूटिंग चालू होतं. खूप धैर्याने आणि शांतपणे आम्हाला सगळ्यांना आधार देत काम चालू ठेवलं. दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं, जेव्हा ही बातमी त्यांना कळाली तेव्हा आमचा एक मिश्कील असा सीन सुरू होता.”
ते पुढे लिहितात, “बातमी ऐकून हादरून गेले, आमचे डायरेक्टर रवी करमरकर यांनी आप्पांना ताबडतोब सोलापूरला निघायला सांगितलं आप्पा म्हणाले सीन पूर्ण करतो, मग निघतो, तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून कधीही जाणार नाही, आपल्या वडिलांची अशी बातमी कळल्यानंतर हे कलाकार ते सगळं दुःख त्याच्या आतमध्ये ठेवून चेहऱ्यावर आनंदी भाव आणून एक मिश्किल सीन करतो, मनामध्ये वादळ असताना अभिनय करायचा, की आपण शांत आहोत, आनंदी आहोत, तो सीन केला त्यांनी आणि मग ते निघाले”
ADVERTISEMENT