क्रूझ ड्रग्स: आर्यन खान प्रकरणात खंडणीचे पुरावे नाहीत, पुढील आदेशापर्यंत तपास स्थगित

मुंबई तक

• 05:10 AM • 23 Dec 2021

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण हे गेल्या काही दिवसात प्रचंड गाजलं होतं. कारण यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणात खंडणीशी संबंधित कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत पुढील आदेश येईपर्यंत तपास थांबवण्यात आला आहे. अटकेनंतर शाहरुखकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाला असा आरोप करण्यात […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण हे गेल्या काही दिवसात प्रचंड गाजलं होतं. कारण यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणात खंडणीशी संबंधित कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत पुढील आदेश येईपर्यंत तपास थांबवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

अटकेनंतर शाहरुखकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाला असा आरोप करण्यात आला होता. याचाच तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष चौकशी पथक स्थापन करून सुमारे 20 जणांची चौकशी केली होती. मात्र, याबाबत अद्याप कोणताही पुरावा न मिळाल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कारण खंडणीच्या प्रकरणात तक्रारदाराच्या एफआयआरच्या आधारे कोणतीही कारवाई केली जाऊ शकत नाही.

खरं तर, एनसीबीचा स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल याने आरोप केला होता की, त्याने आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुखकडून 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचं फोनवर ऐकलं होतं. प्रभाकरच्या या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते.

दुसरीकडे, क्रूझवर छापा टाकणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनच्या प्रमुखपदी असलेल्या समीर वानखेडे यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार आहे. मात्र यावेळी त्यांनी कार्यकाळ वाढवण्याची मागणीही केलेली नाही. अंमली पदार्थांचे प्रकरण एनसीबी एसआयटीकडे हस्तांतरित करण्यात आले आहे आणि आर्यन खानला या प्रकरणाच्या संदर्भात दर शुक्रवारी एनसीबी मुंबई कार्यालयात नियमित हजर राहण्याच्या अटीतूनही सूट देण्यात आली आहे.

या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर वादात सापडला होता. यामुळे आर्यनला अनेक दिवस तुरुंगात काढावे लागले होते. आर्यनला या प्रकरणी जामीन मिळाला असला तरी तो अजूनही ड्रग्ज प्रकरणाच्या तावडीतून पूर्णपणे बाहेर आलेला नाही.

दर शुक्रवारी NCB कार्यालयात हजर राहण्याची गरज नाही

NCB ने आर्यन खानला 2 ऑक्टोबरला अटक केली होती. त्यानंतर त्याला 28 दिवस तुरुंगात रहावं लागलं होतं. 28 ऑक्टोबरला त्याला जामीन मंजूर झाला आणि 30 ऑक्टोबरला तो तुरुंगाच्या बाहेर आला. त्यानंतर कोर्टाने ठेवलेल्या जामिनाच्या अटीप्रमाणे दर शुक्रवारी आर्यन खान एनसीबी कार्यालयात हजर राहत होता.

जामीन मिळाल्यानंतर 5, 12, 19, 26 नोव्हेंबर आणि 3 डिसेंबर तसंच 10 डिसेंबरलाही एनसीबी कार्यालयात हजर झाला होता. जामीन मंजूर करतानाच दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत आर्यन खानला एनसीबी कार्यालयात हजर रहावं लागेल असं हायकोर्टाने म्हटलं होतं.

… तर आर्यन खान निर्दोष असल्याचंच सिद्ध होतं; गृहमंत्री वळसे-पाटील यांचं मोठं विधान

वकील अमित देसाई यांनी आर्यन खानची बाजू मांडत असा युक्तिवाद केला होता की, ‘या खटल्यात काहीही घडत नाही. आर्यन खान तपासात सहकार्य करायला तयार आहे. एनसीबीला हवं असेल तेव्हा तो या कार्यालयात येऊ शकतो.

या प्रकरणाचा तपास आता दिल्ली एनसीबीकडे आहे. त्यामुळे आर्यनला जर दिल्लीला जावे लागले तर विमानाने तो दिल्लीलाही जाईल. प्रत्येक शुक्रवारी त्याला मुंबई एनसीबी कार्यालयात हजर रहावं लागतं. त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त असतो. आर्यन खानपेक्षा पोलिसांची ही कुमक इतर अनेक चांगल्या कामांच्या दृष्टीने वापरता येईल.’

एनसीबीचे वकील श्रीराम शिरसाट यांनी सांगितले की एजन्सीला या बदलात कोणतीही अडचण नाही परंतु आमची एकच विनंती आहे की जेव्हा जेव्हा त्याला बोलावले जाईल तेव्हा त्याने सहकार्य करावे आणि जेव्हा जेव्हा बोलावले जाते तेव्हा त्यांनी मुंबई किंवा दिल्लीला यावे.

ज्यानंतर आर्यन खान याला बॉम्बे हायकोर्टाने मोठा दिलासा देता असं म्हटलं होतं की, आर्यन खानला दर शुक्रवारी NCB कार्यालयात हजर राहण्याची गरज नाही.

    follow whatsapp