राज्यमंत्र्यांनी चालवली सायकल, आता माजी मंत्र्यांचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई तक

• 01:35 AM • 18 Oct 2021

राजकारणात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या नेते मंडळीकडून राजकारणातच वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो. याचाच प्रत्यय इंदापूर तालुक्यातल्या आजी-माजी मंत्र्यांच्या कृतीतून सध्या येताना दिसत आहे. इंदापुरात राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी सायकल चालविल्यानंतर आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी चक्क ट्रॅक्टर चालवला. सायकल आणि ट्रॅक्टर चालवतानाचे दोन्ही नेत्याचे हे व्हिडीओ मतदारसंघ आणि जिल्ह्यात चांगलेच […]

Mumbaitak
follow google news

राजकारणात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या नेते मंडळीकडून राजकारणातच वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो. याचाच प्रत्यय इंदापूर तालुक्यातल्या आजी-माजी मंत्र्यांच्या कृतीतून सध्या येताना दिसत आहे. इंदापुरात राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी सायकल चालविल्यानंतर आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी चक्क ट्रॅक्टर चालवला.

हे वाचलं का?

सायकल आणि ट्रॅक्टर चालवतानाचे दोन्ही नेत्याचे हे व्हिडीओ मतदारसंघ आणि जिल्ह्यात चांगलेच व्हायरल झाले आहेत. दोन्ही व्हिडीओवरून सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली असून, गटबाजीच्या राजकारणामुळे लोकांचं मात्र मनोरंजन होताना दिसत आहे.

इंदापूर तालुक्यात राज्यमंत्री दत्ता भरणे आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात कार्यक्रमांसाठी चांगलीच रस्सीखेच पहायला मिळतेय. दसऱ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सायकल क्लबच्या सदस्यांसमवेत दत्ता भरणे यांनी स्वतः सायकल चालवून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

भरणे यांच्या सायकल चालवल्याची चर्चा थांबत नाही, तोच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दसऱ्यानिमित्त कार्यकर्त्यांने आणलेल्या ट्रॅक्टरचे पूजन करत तो चालवण्याचा आनंद घेतला. दोन्ही नेत्यांनी समर्थकांची मन राखली, पण त्यांच्या या कृती एकमेकांना उत्तर देण्यासाठी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

‘कुठलीही चौकशी नाही, भाजपत गेल्यावर झोप लागते’, हर्षवर्धन यांच्या वक्तव्यावर पवार म्हणतात..

या दोन्ही आजी-माजी मंत्र्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विधानसभा निवडणुकांना अजून बराच अवधी असला, तरी इंदापूर तालुक्यात राजकीय कलगीतुरा आतापासून बघायला मिळू लागला आहे. राज्यमंत्री दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या अनेकदा जुगलबंदी रंगते. त्यामुळे लोकांची कामं होतात आणि मनोरंजनही..!

    follow whatsapp