महाराष्ट्रातील परीक्षा घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चर्चा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे असं आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले तर त्यावर चर्चा झालीच पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. या घोटाळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहचले आहेत असाही आरोप यावेळी फडणवीस यांनी केला.
ADVERTISEMENT
TET Exam scam : पात्र उमेदवारांच्या यादीत घुसवली 500 नावे; असा करण्यात आला घोटाळा…
न्यासा नावाची एक कंपनी आहे, या कंपनीला 21 जानेवारी 2021 ला या अपात्र ठरवलं. त्यानंतर ही कंपनी कोर्टात गेली. ज्यानंतर 4 मार्च 2021 ला याच कंपनीला पात्र ठरवण्यात आलं. हायकोर्टाच्या आदेशाने पात्र केलं असं उत्तर दिलं जाईल. पण माझा प्रश्न असा आहे की त्यांनाच काम देण्याची आवश्यकता काय होती ? न्याासाशिवाय इतर कंपन्या नव्हत्या का?
न्यासाला परीक्षांचं काम दिल्यानंतर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाच्या भरतीत घोटाळा झाला. त्यानंतर म्हाडाच्या भरतीत घोटाळा झाला. GA सॉफ्टवेअरलाही एप्रिलमध्ये अपात्र ठरवलं गेलं. आता TET घोटाळा झाला आहे. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात हे घोटाळे या ठिकाणी चाललेत. 25 आणि 26 सप्टेंबरला 6 हजारांहून अधिक पदांसाठी परीक्षा घेतली. न्यासाने या परीक्षेत पेपर फोडण्यापासून पुढच्या अनेक गोष्टी केल्या.
नवी मुंबईच्या उमेदवाराला अमरावतीचं केंद्र, अमरावतीच्या उमेदवाराला जळगावचं केंद्र, विदर्भाच्या उमेदवाराला रत्नागिरीचं केंद्र मिळालं हे असे प्रकार यावेळी घडले. एकाला तर दिल्लीचं केंद्र मिळालं. माजी आमदार प्रकाश शेणगे यांनी यासंदर्भातला ऑडिओ क्लिप समोर आणल्या. ज्यामध्ये न्यासा कंपनीचा दलाल नियुक्तीची हमी देत होता. संपूर्ण नियुक्त्यांचं रेट कार्डच यामध्ये सांगण्यात आलं आहे असाही आरोप फडणवीस यांनी केला.
क गटातील नियुक्तीसाठी 15 लाख रूपये, ड गटातील नियुक्तीसाठी 8 लाख रूपये. एकट्या अमरावती जिल्ह्यात २०० उमेदवारांनी पैसे दिल्याचा दावा त्या क्लिपमध्ये न्यासाच्या दलालाने केला आहे असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ड गटाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती. या घोटाळ्याचे तार मंत्रालयापर्यंत आहेत. महेश बोठले याला अटक झाल्यानंतर मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह बारा जणांची माहिती मिळाली. प्रशांत बडगिरेंच्या ड्रायव्हरकडे प्रश्नपत्रिका मिळाल्या अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. परीक्षांचा घोटाळा खूप मोठा आहे.
GA सॉफ्टवेअर कंपनी काळ्या यादीत होती आणि त्या कंपनीला तीन महिन्यात काळ्या यादीतून बाहेर काढण्यात आलं असाही आरोप फडणवीस यांनी केला. या संदर्भात चर्चा लावली गेली पाहिजे अशीही मागणी मी आपल्याला करतो आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT