धुळे : अवधान गावात पाच जणांचा सामुहीक आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

मुंबई तक

• 06:44 AM • 23 Feb 2022

धुळे शहराजवळील अवधान गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या गावातील दौलत नगर परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पाचही जणांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आत्महत्या केलेलं कुटुंब अवधान गावातील दौलत नगरात गेल्या काही […]

Mumbaitak
follow google news

धुळे शहराजवळील अवधान गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या गावातील दौलत नगर परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

ही घटना उघडकीस आल्यानंतर पाचही जणांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आत्महत्या केलेलं कुटुंब अवधान गावातील दौलत नगरात गेल्या काही दिवसांपासून एक घर भाड्याने घेऊन राहत होतं. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलीसह महिलेचाही समावेश आहे.

कोल्हापूर : घरगुती वादातून उच्चशिक्षीत मुलीने केला वडिलांचा खुन, स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

सध्या या पाचही जणांची प्रकृती चिंजाजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या कुटुंबाने नेमका आत्महत्येचा प्रयत्न का केला असावा यामागचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये.

    follow whatsapp