अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सातारा जिल्ह्यातील नरबटवाडी (ढाकणी) येथील सामाजिक कार्यकर्ते पोपटराव नरबट आणि त्यांचा मुलगा विश्वास नरबट यांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरुन प्रवास करत असताना नरबट पिता-पत्राच्या गाडीला ढाकणी फाट्यावर अज्ञात बोलेरो गाडीने धडक दिल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
पोपटराव आणि त्यांचा मुलगा विश्वास हे संध्याकाळी आपल्या दुचाकीवरुन म्हसवड-मायणी रस्त्याने निघाले होते. यादरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या या ट्रॉलीला दुचाकी पास करत असताना समोरुन येणार्या पांढर्या रंगाच्या बोलेरो गाडीनेजोराची धडक दिली. धडकेननंतर बोलेरो गाडी न थांबता निघून गेली. या धडकेत दुचाकीवर बसलेला लहानगा विश्वास जागेवरच ठार झाला. विश्वासचे वडील पोपटराव हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी अकलूज येथे नेत असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.
ह्रदयद्रावक! लेकीला वाचण्यासाठी आईवडिलांनी केले शर्थीचे प्रयत्न, पण चिमुकलीसह आईचाही मृत्यू
या घटनेबद्दल नरबट यांच्या परिवाराने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पिता-पत्राच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून नरबट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोपट नरबट हे सामाजिक कार्यात हिरेरिने सहभाग घेत असत नरबटवाडी येथे अद्ययावत वाचनालय उभे करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. प्राथमिक शाळा तालुक्यातील एक आदर्श शाळा बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पत्नी आशा वर्कर म्हणून आरोग्य विभागात काम करत असताना कोरोना काळात पत्नी बरोबर ढाकणी नरबटवाडी येथे फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्रामाणिकपणे काम केलं होतं. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT