सुशांतवर तयार होणाऱ्या ‘न्याय’ सिनेमासंदर्भात वडिलांची कोर्टात याचिका

मुंबई तक

• 08:18 AM • 20 Apr 2021

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या जीवनावर एक सिनेमा येतोय. मात्र या सिनेमासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. न्याय द जस्टिस असं या सिनेमाचं नाव आहे. दिग्दर्शक दिलीप गुलाटी यांच्या या सिनेमासंदर्भात खूप गदारोळ […]

Mumbaitak
follow google news

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या जीवनावर एक सिनेमा येतोय. मात्र या सिनेमासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

हे वाचलं का?

न्याय द जस्टिस असं या सिनेमाचं नाव आहे. दिग्दर्शक दिलीप गुलाटी यांच्या या सिनेमासंदर्भात खूप गदारोळ माजला आहे. रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा तयार करण्यासाठी सुशांतच्या कुटुंबियांची परवानगी घेतली गेली नव्हती. तर सिनेमाच्या निर्मात्यांच्या म्हणण्याप्रमाणे, सुशांतची केस पब्लिक डोमेनमध्ये असल्याने कोणत्याही परवानगीचा प्रश्न उपस्थित होत नाही.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर असलेल्या सिनेमाचा टिझर रिलीज

काही दिवसांपूर्वी न्याय द जस्टिस या सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला होता. दरम्यान या टीझरनंतर सुशांतचं कुटुंब फार नाराज असल्याची माहिती आहे. ‘न्याय- द जस्टिस’ या सिनेमात अभिनेता सुशांतची भूमिका सुशांतची भूमिका जुबेर करत आहे. तर रिया चक्रवर्तीची भूमिका श्रेया साकारत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे.

या सिनेमाची कथा सुशांतचा मृत्यू कसा झाला या प्रश्नाभोवतीच पहायला मिळतेय. आहे. या सिनेमाचा टिझर 58 सेकंदाचा आहे. सुप्रसिद्ध अभिनेता महिंदर सिंग याच्या मृत्यूच्या ब्रेकिंग न्यूजने टिझरची सुरुवात होतेय. यानंतर अभिनेत्याचं संपूर्ण मृत्यूप्रकरण उलगडण्याचा प्रयत्न केलाय. ज्याप्रमाणे सुशांतच्या मृत्यूचा तपास देशाभरातील तीन सयंत्रणा करत होत्या त्याचप्रमाणे या टिझरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

    follow whatsapp