ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या कोरोना व्हेरिएंटने नाशिकमध्ये शिरकाव झाल्याची शक्यता आहे. पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली असून, आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
ADVERTISEMENT
पश्चिम आफ्रिकेच्या माली या देशातून तीन नागरिक नाशिकमध्ये एका खासगी कंपनीत आले आहेत. तीन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आल्याने संबंधित नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एका नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दोन नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा आरोग्य विभागातर्फे शोध घेतला जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आला आहे. दक्षिण अफ्रिकेत हा व्हेरिएंट सर्वात आधी आढळला. या व्हेरिएंटने जगातल्या अनेक देशांचं टेन्शन वाढवलं आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन जगातल्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे असं सांगितलं आहे.
मराठवाडयातही ‘ओमिक्रॉन’चा प्रवेश! दुबईहून परतलेल्या दोघांपैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटव्ह
काय म्हणाले आहेत बोरिस जॉन्सन?
रोज कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या शेकडो नागरिकांना रूग्णालयात दाखल करावं लागतं आहे. त्यातच आज कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 30 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घ्यावा असं आवाहन बोरिस जॉन्सन यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे ओमायक्रॉनकडे मुळीच दुर्लक्ष करू नका असा सावधगिरीचा इशाराही बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगभरातल्या अनेक देशांची काळजी वाढवली आहे. जगभरात हा व्हेरिएंट वेगाने पसरतो आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा कोरोनाची लाट येऊ शकते अशी शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. WHO ने ओमायक्रॉन या व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या श्रेणीत टाकलं आहे. या व्हेरिएंटबाबत UK च्या वैज्ञानिकांनी एक रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये हे नमूद करण्यात आलं आहे की जर या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी आवश्यक ते उपाय योजले नाहीत तर पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे 25 ते 75 हजार मृत्यू होऊ शकतात. लंडन येथील स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि दक्षिण अफ्रिकेच्या स्टेलनबोश विद्यापीठाच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे.
देशात कोरोनाच्या ओमिक्रॉनचे 40 रूग्ण आहेत. त्यापैकी 20 रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्यात आता नाशिकमध्ये एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याचा अहवाल येणं अपेक्षित आहे.
ADVERTISEMENT