डोंबिवली : एका भाजीविक्रेत्याची दुसऱ्या भाजीविक्रेत्याला मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई तक

• 03:47 PM • 03 Sep 2021

ठाण्यात फेरीवाल्याने सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्यानंतर परप्रांतीयांच्या मुद्द्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. डोंबिवलीत आज पुन्हा एकदा याच वादाची पुनरावृत्ती पहायला मिळाली. डोंबिवलीत परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी एका मराठी भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात रामनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली पूर्वेतील भाजी मार्केट परिसरात गुरुवारी भाजी विक्रेत्यांमध्ये […]

Mumbaitak
follow google news

ठाण्यात फेरीवाल्याने सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्यानंतर परप्रांतीयांच्या मुद्द्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. डोंबिवलीत आज पुन्हा एकदा याच वादाची पुनरावृत्ती पहायला मिळाली. डोंबिवलीत परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी एका मराठी भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात रामनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

डोंबिवली पूर्वेतील भाजी मार्केट परिसरात गुरुवारी भाजी विक्रेत्यांमध्ये वाद होऊन मारामारीची घटना घडली. यामध्ये चार जणांनी एकाला लाकडी दांडक्याने व बुक्क्यांनी मारहाण करीत नाक फोडले आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात परशुराम मल्याली, जयेश मल्याली, विष्णू मल्याली, सुभाष मल्याली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळवली येथे राहणारे कमलाकर पाटील हे डोंबिवली पूर्वेकडील राजेश ज्वेलर्स दुकान परीसरातील भाजी मार्केटगल्ली मध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करतात.

यावेळी सांगरली येथे राहणारे परशुराम मल्याली, जयेश मल्याली, सुभाष मल्याली आणि विष्णू मल्याली हे देखील पाटील दाम्पत्यांच्या बाजूला भाजी विकायला बसले होते. यावेळी कमलाकर पाटील यांच्या पत्नीने या चौघांना ओरडून भाजी विकू नका असं सांगितले. या गोष्टीचा राग मनात ठेवून या चौघांनी शिवीगाळ करत पाटील यांना लाकडी बांबूने व ठोशाबुक्क्याने जबरदस्त मारहाण केली.

या घटनेमुळे पुन्हा एकदा डोंबिवली शहरात परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी वाढली असल्याचे दिसून येत आहे. या घटनांमुळे स्थानिक मराठी भाजी व किरकोळ विक्रेत्यांमध्ये देखील भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण असल्याचे समजते. याप्रकरणी रामनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

    follow whatsapp